Lok Sabha Election 2024 : फडणवीसांपाठोपाठ मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी रणशिंग फुंकलं, ६ जानेवारीपासून महाराष्ट्र दौरा करणार

येत्या मार्च महिन्यापासून आचारसंहिता लागेल. त्यामुळे आपल्या हातात ६० दिवसच उरले आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागा असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले.

237
Lok Sabha Election 2024 : फडणवीसांपाठोपाठ मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी रणशिंग फुंकलं, ६ जानेवारीपासून महाराष्ट्र दौरा करणार
Lok Sabha Election 2024 : फडणवीसांपाठोपाठ मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी रणशिंग फुंकलं, ६ जानेवारीपासून महाराष्ट्र दौरा करणार

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांचा लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) पार्श्वभूमीवर राज्यव्यापी दौरा जाहीर झाल्यानंतर, आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही (cm eknath shinde) मैदानात उतरले आहेत. कारण एकनाथ शिंदे (cm eknath shinde) हे लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election) येत्या ६ जानेवारीपासून महाराष्ट्र दौरा करणार आहेत. (Lok Sabha Election 2024)

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची ऑनलाईन बैठक गुरुवारी (२८ डिसेंबर) पार पडली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (cm eknath shinde) लोकसभेच्या दृष्टीने महाराष्ट्र दौरा करणार आहेत. त्या दौऱ्याच्या तयारी निमित्त या बैठकीत चर्चा झाली. (Lok Sabha Election 2024)

येत्या मार्च महिन्यापासून आचारसंहिता लागेल. त्यामुळे आपल्या हातात ६० दिवसच उरले आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) तयारीला लागा असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. (Lok Sabha Election 2024)

(हेही वाचा – Pravin Darekar : काँग्रेस पक्षासोबत गेलेल्या उद्धव ठाकरेंना हिंदुत्वाविषयी बोलण्याचा नैतिक अधिकार नाही; प्रविण दरेकरांचा घणाघात)

महायुतीचं टार्गेट ४५ प्लस आहे 

दरम्यान “येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election) केवळ राज्याचेच नव्हे तर संपूर्ण देशाचं लक्ष केवळ आणि केवळ आपल्याकडे असेल. आपण बाळासाहेब ठाकरेंचा विचार जपण्यासाठी वेगळ पाऊल उचलून, महायुतीचं सरकार स्थापन केलं. त्यामुळे आपण या निवडणुकीत झोकून देऊन काम करायचं आहे. महायुतीचं टार्गेट ४५ प्लस आहे, ते गाठण्यात काही अशक्य वाटत नाही, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. (Lok Sabha Election 2024)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (cm eknath shinde) यांच्या महाराष्ट्र दौऱ्याच्या पहिल्या टप्प्याची सुरुवात येत्या ६ जानेवारीपासून होणार आहे. यवतमाळ, वाशिममध्ये आणि रामटेक इथं ६ जानेवारीला पदाधिकारी मेळावा होईल. (Lok Sabha Election 2024)

एकनाथ शिंदे यांचा राज्यव्यापी दौरा असा असेल

या बैठकीत मुख्यमंत्री म्हणाले, “ही जागा लढली, ती जागा सोडली अशा वेगवेगळ्या बातम्या मीडियातून, सोशल मीडियातून येतील. पण आपण ४८ जागा महायुती म्हणून लढायचं आहे. चार राज्यात निवडणुका झाल्या, त्यावेळी मीडियाने, विरोधकांनी काय काय वर्तवलं होतं. पण सगळ्यांचे अंदाज फोल ठरले. तीन राज्यात भाजप पूर्ण बहुमताने निवडून आलं. त्यामुळे कुठली जागा गेली, कुठली आली हे डोक्यात ठेवू नका, आपल्याला ४८ जागा लढून महायुती म्हणून जिंकायच्या आहेत” असं यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. (Lok Sabha Election 2024)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.