शिवसेना पक्षाचे नाव आणि पक्ष चिन्ह मिळाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रविवारी, ९ मार्चला आपल्या पक्षातील आमदार-खासदार आणि नेत्यांसोबत अयोध्येच्या दौऱ्यावर जात आहेत. या अयोध्या दौऱ्याची सध्या चांगलीच चर्चा सुरू असून राजकीय वर्तुळातून या दौऱ्यावर प्रतिक्रिया उमटत आहेत. रावणराज्य चालवणारे अयोध्येला चालले, अशी टीका ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी केली आहे. या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चांगलेच प्रत्युत्तर दिले आहे.
काय म्हणाले मुख्यमंत्री?
प्रसारमाध्यमांसोबत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, ‘जेव्हा त्यांचा जन्म झाला नव्हता, तेव्हापासून मी काम करतोय. माझ्या दौऱ्यामुळे सर्व जण कामाला लागले आहेत. मी घरात बसणाऱ्यांना बाहेर काढले आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे देखील स्वप्न होते, अयोध्येत प्रभू रामाचे भव्यदिव्य मंदिर व्हावे. आज ते स्वप्न साकार होत आहेत.’
आदित्य ठाकरे काय म्हणाले होते?
‘हे कलयुग आहे. रावणराज्य चालवणारे अयोध्येला चालले आहेत. पण, नक्कीच महाराष्ट्रात पुन्हा रामराज्य आणू. रघुकुल रीत सदा चल आई, प्राण जाए पर वचन न जाई… हे आमचे ब्रीदवाक्य आहे. जनतेला दिलेले वचन पूर्ण करून दाखवू. तसेच, लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी वज्रमूठ सगळीकडे सुरू आहे,’ असे आदित्य ठाकरे म्हणाले होते.
(हेही वाचा – नाना पटोलेंनी न विचारता विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यामुळे मविआचे सरकार पडले – आशिष देशमुख)
Join Our WhatsApp Community