मुख्यमंत्री म्हणाले, सगळं विसरून होळीचा आनंद घ्या

149
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परिवारासह धुळवडीचा आनंद घेतला, त्यावेळी त्यांच्यासोबत असलेला त्यांचा नातू सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. यावेळी त्यांचा मुलगा खासदार श्रीकांत शिंदे हेही होते. या प्रसंगी मुखमंत्री शिंदे यांनी सगळं विसरून होळीचा आनंद घ्यायचा असतो, तसा आनंद घ्या, असे आवाहन केले.
यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, मागील ८ महिन्यांपासून राज्यात सर्व उत्सव जोरात साजरे होत आहेत, मग दहीहंडी असो, गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, दिवाळी आणि आता होळी असो सर्व उत्सव जोरात साजरे होत आहेत. राज्यात सध्या आनंदाचे वातावरण आहे, सर्वांनी पर्यावरणपूरक होळी साजरी करावी, असे आवाहनही मुख्यमंत्री यांनी केले.
दरम्यान मागील २४ तासांत राज्यात ठिकठिकाणी अवकाळी पाऊस पडला आहे. त्यामुळे शेतीचे नुकसान झाले आहे. राज्यातील जिल्ह्याधिकाऱ्यांना तातडीने पंचनामा करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार शेतकऱ्यांना तातडीने मदत दिली जाईल, असे आश्वासनही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.