डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनी मुख्यमंत्र्यांची ग्वाही; म्हणाले, ‘इंदू मिलमधील स्मारक…’

99

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आज ६६ वा महापरिनिर्वाण दिन आहे. यानिमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दादर चैत्यभूमीवर अभिवादन केले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी इंदू मिल स्मारकाबाबतही वक्तव्य केले.

(हेही वाचा – आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणदिनी राज ठाकरेंचं अभिवादन; म्हणाले,’बाबासाहेबांच्या व्यक्तिमत्त्वाचे हे पदरही…’)

सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चैत्यभूमीवर जाऊन अभिवादन केले. यावेळी त्यांनी इंदू मिलमधील स्मारक लवकरात लवकर पूर्ण होईल. आम्ही आढावा घेत पाहणी केली आहे. बाबासाहेब यांच्या आठवणी जपण्याचे काम केले जाईल. राजगृहवरील ऐतिहासिक ठेवा सुद्धा जपला जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. तर इंदू मिलमधील आंतरराष्ट्रीय स्मारक लवकरात लवकर पूर्ण होईल, अशी ग्वाही देखील दिली.

पुढे ते असेही म्हणाले की, माझ्यासारख्या सर्व सामान्य कुटुंबातील नागरिक आज मुख्यमंत्री झाला हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळे घडले आहे. दलित समाजात रूजलेली न्यूनगंडाची भावना बाबासाहेबांनी काढून टाकली. दलित बांधवांमध्ये जो आत्मविश्वास निर्माण झाला, त्याचे श्रेय डॉ. आंबेडकरांना जाते. ५ ते ७ डिसेंबरदरम्यान, राज्यभरातून बाबासाहेबांचे अनुयायी अभिवादन करण्यासाठी येतात. येणाऱ्या अनुयायांची गर्दी पाहून मुख्यमंत्री म्हणाले, अभिवादन करण्यासाठी अनुयायांनी मोठी रांग लावली आहे. त्यांना सर्व सुविधा देण्याचे काम राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेकडून करण्यात आले आहे. अनुयायांना सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल मुंबई महापालिकेकडे विशेष धन्यवाद करतो.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.