मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य करण्यात आल्या. त्यानंतर (CM Eknath Shinde) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वत: राजपत्र घेऊन नवी मुंबईत मनोज जरांगे यांची भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी मनोज जरांगे यांना गुलाल लावला.
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी “हा एकनाथ शिंदे शिवरायांची शपथ पूर्ण करणारा शेतकरी पुत्र आहे” असं म्हणत मनोज जरांगे यांचं त्यांनी अभिनंदन केलं.
(हेही वाचा – Israel-Hamas Conflict : मध्य गाझामध्ये हवाई हल्ल्यात १५ जणांचा मृत्यू, मृतांची एकूण संख्या २६ हजारांच्या पुढे)
नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ?
मराठा समाजासाठी ज्याने संघर्ष केला ते मनोज जरांगे पाटील यांचं मी अभिनंदन करतो. फक्त राज्याचंच नव्हे तर संपूर्ण जगाचं लक्ष मराठा आंदोलनाकडे लागलं होतं. आपण अतिशय शांततेत आणि शिस्तीत आंदोलन केलं. कुठेही आंदोलनाला गालबोट न लावता यशस्वी केलं, त्याबद्दलही आपलं अभिनंदन करतो. मी सुद्धा एका शेतकरी कुटुंबातील शेतकऱ्याचा मुलगा आहे. मलाही गोरगरीब समाजाचं दुख आणि वेदना याची कल्पना आहे. म्हणून मी जाहीरपणे छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली होती. ती शपथ पूर्ण करण्याचं काम हा एकनाथ शिंदे करतोय. दिलेला शब्द पाळणं हीच माझी कार्यपद्धती आहे, असे मुख्यमंत्री (CM Eknath Shinde) म्हणाले.
मनोज जरांगे यांची भेट..
🗓️ 27-01-2024📍वाशी https://t.co/ykt1SLNV3H
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) January 27, 2024
(हेही वाचा – Manoj Jarange Patil : मराठा आंदोलकांविरोधातील राजकीय गुन्हे मागे – मुख्यमंत्र्यांनी दिले आदेश)
सर्वसामान्यांचा विचार करणारं सरकार –
मी (CM Eknath Shinde) एक सर्वसामान्य माणूस आहे. मला गोरगरीब समाजाचं दुख आणि वेदना याची कल्पना आहे. आज राज्याचा मुख्यमंत्री सर्वसामान्य माणूस आहे, त्यामुळे हे सरकार सर्वसामान्यांचा विचार करणारं सरकार आहे.
मतासाठी नव्हे, हितासाठी निर्णय –
दरम्यान, आपण मतासाठी नसून हितासाठी निर्णय घेतो, असं मुख्यमंत्री म्हणाले. “आम्ही कधीही मतासाठी नाही तर हितासाठी निर्णय घेतले आहेत. सर्वसामान्यांना न्याय देणारे निर्णय आत्तापर्यंत आपल्या सरकारने घेतले आहेत. या समाजाने अनेक लोकांना नेता केलं. या समाजामुळे अनेक लोकांना मोठी पदं मिळाली”, असं मुख्यमंत्री (CM Eknath Shinde) म्हणाले.
(हेही वाचा – Manoj Jarange Patil यांच्या ‘या’ मागण्या सरकारने केल्या मान्य)
दिलेला शब्द पाळणं ही मझी कार्यपद्धती –
मी जाहीरपणे छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली होती. ती शपथ पूर्ण करण्याचं काम आज मी करतोय. दिलेला शब्द पाळणं हीच माझी कार्यपद्धती आहे. आज आमचे गुरुवर्य आनंद दिघेंची जयंतीही आहे. बाळासाहेबांची जयंती २३ तारखेला झाली. या दोघांचे आशीर्वाद आणि मराठा समाजाच्या शुभेच्छाही पाठिशी आहेत”, असं ते (CM Eknath Shinde) म्हणाले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community