‘दाऊद-मेमनचे हस्तक होण्यापेक्षा,मोदी-शहांचे हस्तक होणे केव्हाही चांगले’, मुख्यमंत्र्यांचा ठाकरेंवर हल्लाबोल

194

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पैठण येथील सभेत ठाकरे गटाविरोधात जोरदार फटकेबाजी केली. यावेळी त्यांनी सामनाच्या अग्रलेखातून शिंदे गटावर करण्यात आलेल्या टीकेचा रोखठोक समाचार घेतला. देशद्रोह्यांचे हस्तक होण्यापेक्षा मोदी,शहांचे हस्तक होणे केव्हाही चांगलेच अशा शब्दांत मुख्यमंत्री शिंदे यांनी उद्धव ठाकरे गटावर घणाघात केला आहे.

होय आम्ही मोदी-शहांचे हस्तक

एकनाथ शिंदे आणि शिंदे गट हे अमित शहा आणि पंतप्रधान मोदींचे हस्तक असल्याची टीका करण्यात आली. पण ज्या देशद्रोही याकूब मेमनला फाशी देण्यात आली त्याच्या कबरीचे उदात्तीकरण कोणाच्या काळात करण्यात आले? मग याकूब मेमन आणि दाऊदचा हस्तक होण्यापेक्षा ज्या मोदी आणि अमित शहांनी बाळासाहेबांचे विचार पुढे नेले त्यांचे हस्तक होणे केव्हाही चांगले असल्याचे म्हणत एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिले आहे.

(हेही वाचाः ‘हिंमत असेल तर मुंबईत मराठी माणूस किती उरलाय हे जाहीर करा’, मुख्यमंत्र्यांचे ठाकरेंना ‘रोखठोक’ आव्हान)

साबणाने तुमची धुलाई केली

यांची आणि यांच्या टीकेची कीव करावीशी वाटते. रोखठोकमध्ये शिंदे गटाचा उल्लेख साबणाचे बुडबुडे असा करण्यात आला. पण याच साबणाने तुमची मस्त धुलाई केली हे विसरू नका. आधी बाळासाहेबांचे विचार बुडवले, मग हिंदुत्व बुडवले. मग बाळासाहेबांच्या विरोधकांशी हातमिळवणी केली. केवळ सत्तेच्या मोहापायी दोन्ही काँग्रेसला जवळ करत आपल्या विचारांची सुंथा कोणी केली, याचे उत्तर महाराष्ट्राला द्या, असे थेट आव्हान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना केले आहे.

(हेही वाचाः ‘अजित पवार 6 वाजल्यापासून काम करतात, पण मी 6 वाजेपर्यंत काम करतो’, मुख्यमंत्र्यांचा टोला)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.