मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रामलल्लाची महाआरती करण्यात आली. या महाआरतीवेळी शिवसेनेचे सर्व खासदार,आमदार आणि मंत्री हजर होते. यावेळी शंखनादात राम मंदिरात आरती करण्यात आली. यावेळी मंदिराबाहेर हजारो शिवसैनिकांची गर्दी होती.
या आरतीनंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी माध्यमांशी बोलतांना श्रीरामाला राज्य सुजलाम सुफलाम करण्याचे साकडे घातले आहे. अयोध्येत श्रीरामाचे मंदिर व्हावे, अशी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे स्वप्न पूर्ण केले आहे. येथून श्रीरामाचे आशिर्वाद घेऊन आम्ही महाराष्ट्रात जाणार आहोत आणि मोठ्या उत्साहात काम करणार आहोत, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. लक्ष्मण किल्ल्याच्या महंतांनी यावेळी बोलताना म्हटलं की, दसऱ्याच्या दिवशी एकनाथ शिंदे यांना आम्ही आशीर्वाद म्हणून धनुष्यबाण दिला होता. आता त्यांना अधिकृतरित्या पक्षाचं चिन्ह मिळालं आहे. आज आम्ही पुन्हा एकदा आशीर्वाद म्हणून त्यांना धनुष्यबाण दिलं.
(हेही वाचा रावणाचे राज्य गेले श्रीरामाचे राज्य महाराष्ट्रात आले – उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Join Our WhatsApp Community