CM Eknath Shinde : लोकसभेची हंडी मोदीच फोडतील; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला विश्वास

धर्मवीर आनंद दिघे यांनी हा उत्सव सुरू केला आणि संपूर्ण महाराष्ट्रात तो साजरा होऊ लागला.

156
CM Eknath Shinde : लोकसभेची हंडी मोदीच फोडतील; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला विश्वास
CM Eknath Shinde : लोकसभेची हंडी मोदीच फोडतील; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला विश्वास

राज्य सरकार ज्याप्रमाणे विकासाचे थर लावत आहे, त्याचप्रमाणे गोविंदा पथकांकडून थरावर थर लावले जात आहेत. राज्यात आता अहंकाराचे थर कोसळले असून, विकासाचे थर रचले जात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात सर्व पक्ष एकत्र येत असले, तरी त्याचा काहीही परिणाम होणार नाही. २०२४ च्या लोकसभेची हंडी मोदीच फोडतील, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

ठाण्यातील टेंभी नाक्यावरील दहीहंडीच्या कार्यक्रमात ते बोलत होते. शिंदे म्हणाले, खरे म्हणजे ठाणे हे गोविंदांची पंढरी आहे. धर्मवीर आनंद दिघे यांनी हा उत्सव सुरू केला आणि संपूर्ण महाराष्ट्रात तो साजरा होऊ लागला. आनंद दिघेंच्या आशीर्वादाने मी मुख्यमंत्री झालो. आम्ही राज्यात चांगले काम करीत आहोत. कोरोनाकाळात घालण्यात आलेली सर्व बंधने काढून टाकत आम्ही यावर्षी आणखी जोरदार उत्सव साजरे करणार आहोत.

प्रो गोविंदा स्पर्धा घेऊन आम्ही दहिहंडीचा साहसी खेळात समावेश केला आहे. या सणासाठी सुट्टीही जाहीर केली. गोविंदांसाठी १० लाखांचा विमा देखील काढला. त्यामुळे सांघिक भावनेने उत्सव साजरा करून या उत्सवाला गालबोट लागता कामा नये, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले. थर लावताना प्रत्येकाने काळजी घ्यावी, तुमचा जीव महत्वाचा आहे, असेही त्यांनी सांगितले.

(हेही वाचा – Mumbai Dahihandi : गोविंदांच्या आनंदावर असे पडले विरजण)

ठाकरेंनी निष्ठा विकली
  • उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या राज्यव्यापी दौऱ्याबाबत माध्यमांनी विचारले असता मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, त्यांनी मुख्यमंत्रीपदासाठी आपली निष्ठा विकली. बाळासाहेबांचे विचार विकणाऱ्यांनी निष्ठेची भाषा आम्हाला शिकवू नये. सनातन धर्माला अनन्य साधारण महत्व आहे. त्यामुळे कितीही स्टॅलीन किंवा इतर कोणी आले तरी सनातन धर्माला धक्का लागू शकणार नाही.
  • कितीही विरोधक एकत्र आले तरी २०२४ ची राजकीय हंडी मोदीच फोडणार आहेत. मोदींच्या नेतृत्त्वात देश प्रगती करत आहे. ही विकासाची आणि प्रगतीची दहीहंडी आहे. दहीहंडीच्या मुहूर्तावर पाऊसही पडत आहे. आपल्यासह बळीराजाला दिलासा देणारी ही बाब असल्याचेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.