मुख्यमंत्र्यांचे (CM Eknath Shinde) शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावरील श्री गणेशाच्या आरतीचा मान इर्शाळवाडी दुर्घटनेत अनाथ झालेल्या चिमुरड्यांना मिळाला. इर्शाळवाडीतील आदिवासी बांधव काल (बुधवार, २७ सप्टेंबर) थेट मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पोहोचले. त्यांच्याहस्ते गणेशाची आरती झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वत: त्या सर्वांचा शाही पाहुणचार केला.
वर्षा निवासस्थानी (CM Eknath Shinde) बुधवारी विविध देशांचे मुंबईतील वाणिज्यदूत, माध्यमांचे संपादक, प्रतिनिधी यांनी गणेश दर्शन घेतले. दरम्यान इर्शाळवाडीतील बांधव संध्याकाळच्या आरतीसाठी खास पाहुणे म्हणून निमंत्रित होते. यावेळी इर्शाळवाडी दुर्घटनेदरम्यान मदत कार्यात मोलाची कामगिरी बजावणाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
(हेही वाचा – Ganesh Visarjan 2023 : बाप्पाला निरोप देण्यासाठी मुंबई सज्ज; ‘या’ रस्त्यांवर असणार ‘नो एन्ट्री’)
२६-९-२०२३ 📍 मुंबई
इर्शाळवाडीतील चिमुकल्यांसह ‘वर्षा’ निवासस्थानी श्री गणेश आरती! pic.twitter.com/VYHfvuSWGO
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) September 27, 2023
‘प्रजा हीच राजा..मी सेवेकरी’ या ओळीचा प्रत्यय देणारे संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आपल्या कृतीतून सामान्यांचे मुख्यमंत्री असल्याची प्रचिती देतात. गेल्या काही दिवसामध्ये ‘वर्षा’वरील श्री गणरायाचे दर्शन आणि आरतीसाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती लावली. बुधवारी दुपारी त्र्यंबकेश्वरमधील आधार आश्रमातील मुलांनी वर्षा निवासस्थानी टाळ-मृदुंगाच्या गजरात आरती केली. त्यानंतर सायंकाळी इर्शाळवाडीतील बांधव सहभागी झाले होते.
यावेळी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक अनिल डिग्गीकर, कोकण विभागीय आयुक्त महेंद्र कल्याणकर, रायगड जिल्हाधिकारी योगेश म्हसे, रायगड पोलिस अधीक्षक अशोक घार्गे, नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त राजेश नार्वेकर, पनवेल महानगरपालिका आयुक्त गणेश देशमुख आदिंचा यावेळी सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी (CM Eknath Shinde) चिमुकल्यांना स्कूल बॅग आणि शालेय साहित्याचे वाटप केले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community