‘हे खपवून घेणार नाही’, मुख्यमंत्री शिंदेंची संतप्त प्रतिक्रिया! काय आहे कारण?

134

1993च्या मुंबई बॉम्बस्फोटातील प्रमुख आरोपी आणि दहशतवादी याकूब मेमन याच्या कबरीचे सुशोभीकरण करण्यात आल्यामुळे एक नवीन वाद उफाळून आला आहे. भाजपने यावरुन भाजपने मुंबई महापालिका आणि तत्कालीन ठाकरे सरकारवर निशाणा साधत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबाबत जनतेची माफी मागावी, अशी मागणी केली आहे. यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाष्य केले आहे.

महाराष्ट्र खपवून घेणार नाही

याकूबच्या कबरीचे जे काही सुशोभीकरण करण्यात आले आहे त्याची सखोल चौकशी करण्यात येईल. दोषींवर कारवाई करण्याबाबत महापालिकेला सूचना देण्यात आल्यात आहेत. याकूब हा स्फोटातील आरोपी असून त्याला दहशतवादी म्हणून फाशी देण्यात आली आहे. त्यामुळे त्याचं उदात्तीकरण महाराष्ट्र खपवून घेणार नाही, असे सांगत शिंदे यांनी कायदेशीर कारवाईचे आदेश दिल्याचे सांगितले आहे.

(हेही वाचाः ‘तुमचा माज कमी करा’, संतप्त पोलिस पत्नीने नवनीत राणांना सुनावले)

काय आहे वाद?

दहशतवादी याकूब मेमन याला 2015 साली फाशी देण्यात आली. त्यानंतर मुंबईतील बडा क्रबस्तान येथे त्याची कबर बांधण्यात आली. या कबरीचे कोरोना काळात सुशोभीकरण करण्यात आले. माध्यमांनी ही बातमी प्रसिद्ध केल्यानंतर मुंबई पोलिसांनी याची दखल घेत या कबरीभोवती असलेली रोषणाई हटवली. पण यावरुन भाजपने तत्कालीन महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला. एका दहशतवाद्याचे स्मारक उभारण्याचा प्रयत्न ठाकरे सरकार आणि मुंबई महापालिकेकडून करण्यात आल्याचा आरोप भाजपने केला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.