भगवे कपडे न घालण्यामागचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितले कारण, म्हणाले…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिंदुत्वाच्या मुद्यावर बोलताना एक किस्सा सांगितला. एकनाथ शिंदे म्हणाले की, मला एकदा पत्रकारांनी विचारले की, तुम्ही भगवे कपडे का घालत नाहीत, पांढरे का घालता? तेव्हा मी त्यांना उत्तर दिले की भगवा हा आमच्या ह्रदयात आहे. पुढे बोलताना, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. शेतकरी, मतदार, हिंदूत्वाशी कुणी गद्दारी केली हे सगळ्यांना माहिती आहे, असे म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे.

( हेही वाचा: SBI बॅंकेच्या ‘Wecare’ योजनेला मुदतवाढ! आता ३१ मार्च २०२३ पर्यंत करू शकता गुंतवणूक )

नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा हिंदुत्वाच्या मुद्यावरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. हिंदूत्व, शेतकरी, मतदार यांच्याशी कोणी गद्दारी केली हे सर्वांना माहिती आहे, असे म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला. पुढे बोलताना ते म्हणाले की, मला एका कार्यक्रमात पत्रकारांनी विचारले की, तुम्ही भगवे कपडे का घालत नाहीत, पांढरे का घालतात? तेव्हा मी त्यांना उत्तर दिले भगवा हा आमच्या ह्रदयात आहे. आम्ही बाळासाहेबांच्या विचारांचे पाईक आहोत आणि त्यांचाच विचार पुढे घेऊन जात असल्याचेही यावेळी एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here