मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिवाळीनिमित्त होणा-या कार्यक्रमांमध्ये राजकीय टीकांचे फटाके जोरात फोडताना दिसत आहेत. सोमवारी त्यांनी ठाण्यातील कार्यक्रमातून उद्धव ठाकरेंवर निशाणा साधताला. दिवाळी पहाटच्या कार्यक्रमात बोलताना, आपण तीन महिन्यांपूर्वीच फटाके फोडले असून ते अजूनही त्याचे डेसिबल मोजत असल्याचा खोटक टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे.
ते आजही डेसिबल मोजत आहेत
कालपासून दिवाळीचे फटाके फुटत आहेत. पण आम्ही तीन महिन्यांपूर्वीच फटाके फोडले आहेत. त्याचा आवाज आजही काहींच्या कानात घुमत आहे. मी त्यांना विरोधक म्हणणार नाही पण जे काही आमचे हितचिंतक आहेत ते त्या फटाक्याच्या आवाजाचे डेसिबल आजही मोजत आहेत. त्यांना मोजत राहू दे पण आपण बेधडक कार्यक्रम केला आहे, अशी टीका एकनाथ शिंदे यांनी केली आहे.
(हेही वाचाः आम्ही साडेतीन महिन्यांपूर्वी मॅच खेळलो आणि…, भारताच्या विजयानंतर शिंदेंची फटकेबाजी)
आम्ही मॅच खेळलो आणि जिंकलो
भारतीय संघाने पाकिस्तानविरुद्ध मॅच जिंकली हा एक आनंदाचा क्षण आहे. मॅचमध्ये मेलबर्नच्या क्रिकेट मैदानातही बाळासाहेबांच्या शिवसेनेचे पोस्टर झळकले. आम्ही तीन साडेतीन महिन्यांपूर्वी एक मॅच खेळलो आणि ती जिंकलो. आम्ही जनतेचं राज्य आणण्याचा प्रयत्न केला. आम्ही सत्तेवर आल्या आल्या आपली संस्कृती जपण्याचा आणि ती पुढे नेण्याचा प्रयत्न केला. राज्यात आता विकासाचे पर्व सुरू झाले आहे, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.
Join Our WhatsApp Community