मुख्यमंत्र्यांचा सूचक इशारा; ‘कंटेनर भरुन खोके कोणाकडे जात होते, ते लवकरच’…

139

राज्यात नवीन सरकार स्थापन झाल्यापासून सुरु झालेला शिंदे आणि ठाकरे गट वाद अद्याप संपेलला नाही. दोन्ही बाजूंनी सातत्याने एकमेकांवर आरोप – प्रत्यारोप केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर शिंदे गटाने केलेल्या गुवाहाटी दौ-यावरुन सध्या राजकीय वातावरण तापले आहे.

ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी शनिवारी बुलढाण्यात घेतलेल्या सभेमध्ये शिंदे गटाच्या गुवाहाटी दौ-यावर आणि कामाख्या देवीच्या मंदिरातील दर्शनावर खोचक टीका केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना सूचक इशारा दिला आहे. शिंदे म्हणाले की, कंटेनर भरुन खोके कोणाकडे गेले आणि कोण ते पचवू शकतं, हे लवकरच जनतेसमोर येईल.

( हेही वाचा: PMPML for Women: महिलांसाठी ‘या’ 19 मार्गांवर धावणार विशेष PMPML बस )

“मी जे करतो ते खुलेआम करतो”

हेलिकाॅप्टरमधून अतिवृष्टीग्रस्त भागाचा दौरा केल्याची टीका उद्धव ठाकरेंनी बुलढाण्यात बोलताना केली होती. त्यावरुन टोला लगावताना एकनाथ शिंदेंनी आपण सगळे खुलेआम करतो, असे म्हटले आहे. मी जे करतो, ते खुलेआम करतो. लपून- छपून करत नाही. काही लोक लपून- छपून करतात. पण अशी कामे उजेडात येतात. ती लोकांना माहिती होतात. दिपक केसरकरांनी केलेले विधान, हे बोध घेण्यासारखे आहे. त्यामुळे इतरांनी आमच्यावर टीका करण्यापेक्षा स्वत:कडे पाहावे. हे बोलणे कोणाला लागू पडतेय ते बघावे. फ्रीजमध्ये भरुन कुठे खोके गेले, असे केसरकर म्हणाले आहेत. मी त्याचा शोध घेतो आणि नंतर त्यावर बोलतो, असे एकनाथ शिंदे म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.