आमचे राजीनामे मागितले जात आहेत. काही लोक म्हणाले होते मी मुख्यंमत्री पद सोडतो, आमदारकी सोडतो. बाळासाहेब दिलेला शब्द कधी मागे घेत नव्हते. आम्ही रक्ताचे पाणी केले, कुटुंबावर घरादारावर तुळशीपत्र ठेवून आलो. आणि आमच्यावर भूखंडाचे श्रीखंड असे आरोप केले, मिळाले काय खोदा पहाड चुहा भी नही निकला. तोंड आहे म्हणून काहीही बोलायचे, असे चालत नाही. सुतावरून स्वर्ग गाठण्याचा प्रयत्न केला आहे, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. सरकार स्थापन झाल्यापासून आठवड्यात सरकार पडेल, महिनाभरात सरकार पडेल, असे म्हणत आहेत. मी ज्योतिषाला हात दाखवला असे म्हणून टीका झाली. हात दाखवायला मी कशाला जाईन, हात जेव्हा दाखवायचा त्याला दाखवला आहे. आम्ही जनतेमधून आलो आहोत, कुणाला हात दाखवायची गरज नाही. ग्रामपंचायत निवडणुकीत आम्हाला जनतेचे पोचपावती दिली आहे. आम्ही पाच नंबरला होतो आता आम्ही बाळासाहेबांची शिवसेना दोन नंबरला आली आहे. पुढील निवडणूक आमची युती जिंकल्याशिवाय राहणार नाही. जिल्हा पातळीवर सीएमओ उभे करत आहोत. माझा स्वभाव शांत आहे ही माझी हतबलता समजू नका. मै खामोश हुं क्योंकी मै सब जनता हुं, बात निकलेगी तो बहुत दूर तक जायेगी, असा गर्भीत इशारा मुख्यमंत्री शिंदे यांनी दिला.
मविआ सरकारमध्ये सत्तेची मस्ती होती
नागपुरात हिवाळी अधिवेशनात विरोधकांच्या अंतिम आठवडा प्रस्तावावर उत्तर देताना मुख्यमंत्री शिंदे बोलत होता. मविआच्या सरकारच्या विरोधात बोलल्यावर संबंधिताच्या घरी बुलडोझर जायचे, त्यांना जेलमध्ये टाकले जायचे, कंगना राणावत हिचे घर तोडण्यासाठी महापालिकेचे ८० लाख खर्च केले. रवी राणा आणि त्यांची पत्नी खासदार या दोघांना हनुमान चालीसा म्हटले म्हणून तुरुंगात टाकले. अर्णब गोस्वामी यांना तळोजा तुरुंगात बदडले. तुमच्याविरोधात बोलले म्हणून कारवाई केली, आमच्या विरोधात बातम्या लावणाऱ्यांविरोधात आम्ही कारवाई करत नाही. केंद्रीयमंत्री राणे यांना तुम्ही जेवणावरून उठवेल आणि कोर्टात घेऊन गेले काय म्हणाले होते ते, तुम्ही तर आमच्या विरोधात काय काय बोलत आहेत. आम्ही तुरुंगात टाकले का? गिरीश महाजन यांचा पूर्ण कार्यक्रम करण्याचे ठरवले होते. महाजन सध्या बेलवर आहे, पण काही लोक जेलमध्ये कधीही जाऊ शकतात. मुख्यमंत्रीपदाची हवा तुम्ही केवढी केली होती. देवेंद्र फडणवीस यांनाही अडकवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला, तुम्ही कशी सत्ता राबवत होतात, अधिकाऱ्यांचे नाव आज घेत नाही. आमच्यासकट काही लोकांच्या चौकशा लावण्याचे पाप केले होते, ती सत्तेची मस्ती नव्हती का? कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न कुणी विचारायचा? तुमचा गृहमंत्री जेलमध्ये गेला त्यांनी विचारावा का? त्यामुळेच आम्ही पूर्ण तख्त पलटून टाकले, असा घणाघाती हल्ला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला.
(हेही वाचा शीख धर्मियांचा अवमान केलात, महाराष्ट्राची जनता नोंद ठेवील – मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंना इशारा )
बाळासाहेबांच्या पायाला हात लावण्याचा हक्क तुम्ही गमावला
कोरोना काळात आपलेच जेव्हा परके झाले होते, तेव्ह आम्ही रस्त्यावर उतरून काम करत होतो, एकेक रुग्णालयात गेलो, त्यांना साहाय्य केले. त्यामुळे आम्हाला काय शिकवता? सीमावादात लाठ्याकाठ्यांचे क्रेडिट तुम्ही घेऊ शकत नाही, असे म्हणत आहेत. आजही आम्ही बाळासाहेबांच्या शिवसेनेतच आहे आणि त्यांचे क्रेडिट बाळासाहेब आणि धर्मवीर आनंद दिघे यांना जाते. राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील म्हणाले की, राष्ट्रवादीचे शिवसेना. हेच आम्ही आधीपासून बोलत आहोत. तेव्हा भास्करराव जाधवही ‘बरोबर’ असे म्हणाले. बाप चोरला, पक्ष चोरला काय काय, आम्हाला बोलत आहेत. ज्यांनी त्यांना संपवण्याचा प्रयत्न केला, ज्यांनी त्यांना तुरुंगात टाकण्याचा प्रयत्न केला, त्यांच्या मांडीला मांडी लावून मुख्यमंत्रीपदाच्या लालसेपोटी कोण बसले? खुर्चीसाठी पक्ष चोरला म्हणाले, पण बाळासाहेबांचे विचार ज्यांनी विकले त्यांनी आम्हाला शिकवण्याची गरज नाही. बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी केली आहे. महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागा. दोन्ही काँग्रेससोबत जेव्हा तुम्ही सत्ता स्थापन केली, तेव्हाच तुम्ही बाळासाहेबांच्या पायाला हात लावण्याचा हक्क तुम्ही गमावला आहे, असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
Join Our WhatsApp Community