शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मिळाल्यानंतरही ठाकरे गटाला शिवसेनेच्या बँक खात्यातील पैशांचा मोह आवरता आलेला नाही. शिवसेनेच्या खात्यातील ५० कोटी रुपये त्यांनी लेखी पत्राव्दारे मागितले आहेत. त्यामुळे यावरून राजकारण रंगताना दिसत आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ते पैसे तातडीने ठाकरे गटाला देण्याची सूचना करीत ‘आम्ही बाळासाहेबांच्या संपत्तीचे नव्हे, तर विचारांचे वारसदार आहोत’, असे स्पष्ट केले आहे.
याविषयी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, आमच्यावर ५० खोक्यांचा आरोप करता आणि आमच्याकडेच ५० कोटी रुपये द्या म्हणून पत्र लिहिता. खरा पक्ष आमचा, धनुष्यबाण आमचा तरी शिवसेनेच्या बँक खात्यात असलेले ५० कोटी यांनी आमच्याकडे मागितले, माझ्याकडे हे पत्र आहे, मी एका मिनिटाचा विचार केला नाही, तत्काळ देऊन टाका, म्हणून सांगितले. तुमची संपत्ती, मालमत्ता आम्हाला नको. बाळासाहेबांचे विचार हीच आमची संपत्ती आहे. त्यांचा फक्त पैशांवर डोळा आहे, अशी टीका एकनाथ शिंदे यांनी केली.
(हेही वाचा – Covid Centre scam : माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर गुन्हा दाखल)
ते पैशांसाठी हपापलेले – शीतल म्हात्रे
शिवसेना पक्ष आमचा, म्हणजे पक्षाकडे असलेला निधीही आमचाच. पण, शिवसैनिकांच्या ५० कोटींच्या लोण्यावर नजर लावून बसलेले बोके आम्ही आज पाहिले. आम्हाला बाळासाहेबांची संपत्ती नकोय, आम्ही विचारांचे वारसदार आहोत. त्यांनी पक्षाच्या बॅंक खात्यातले ५० खोके लेखी पत्राव्दारे मागितले आणि आमच्या मुख्यमंत्र्यांनी ‘एकदम ओक्के’ म्हणून ते पैसे दुसऱ्या मिनिटाला देऊन टाकले. सत्ता आणि पैशासाठी ते किती हपापले आहेत ते आज सिद्ध झाले. आता हे पन्नास कोटी नाईट लाईफ आणि ब्रॅण्डेड शर्ट्सवर उधळू नका. लोकांच्या भल्यासाठी वापरा, असा सल्ला शिवसेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी ठाकरे गटाला दिला आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community