संघर्षाचा तो काळ होता, आज आमचे स्वागत करत आहेत, मोदीजींनी आमचे स्वप्न पूर्ण केले आहे. मुख्यमंत्री अयोध्येत असले तरी ते राज्यात ओला दुष्काळावर लक्ष ठेवून आहेत. श्रीरामाचे दर्शन हा फार मोठी आत्मिक आनंद असतो, श्रीरामावर भक्ती करणारे सरकार महाराष्ट्रात आले आहे, या दो-यावर आदित्य ठाकरे टिका करत आहेत, त्यांना अजून प्रगल्भ व्हायचे आहे, त्यांच्या टिकेवर प्रतिक्रिया देण्याची आवश्यकता नाही, आधीचे सरकार रावणाचे होते, आज श्रीरामावर भक्ती करणारे सरकार राज्यात आले आहे, अशी प्रतिक्रिया उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
रॅलीचे आयोजन
आयोध्येत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे रविवार, ९ एप्रिल रोजी आयोध्येत दाखल झाले. पंचशील हॅाटेलवरून ते आयोध्येत दाखल झाले. यावेळी मोठ्या संख्येने शिवसैनिक आणि भाजपचे कार्यकर्ते उपस्थित आहेत. प्रचंड गर्दी त्यावेळी आहे. ओपन जीपवरून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री उपस्थितांना अभिवादन करतांना दिसत होते. उत्तर प्रदेशच्या सरकारने या दोन्ही नेत्यांचे जंगी स्वागत केले. जय श्रीराम या घोषणा देत कार्यकर्ते या रॅलीत सहभागी झाले. मुख्यमंत्री झाल्यावर एकनाथ शिंदे प्रथमच आयोध्येला आले.
(हेही वाचा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आयोध्येत दाखल; मोठी रॅली)
Join Our WhatsApp Community