अखेर सर्व ३६ जिल्ह्यांना मिळाले पालकमंत्री, जाणून घ्या तुमच्या जिल्ह्याची जबाबदारी कोणाकडे?

245

राज्यात शिवसेना-भाजप युतीचे सरकार स्थापन होऊन ८३ दिवस उलटले, तरी पालकमंत्र्यांची नियुक्ती होत नसल्याने विरोधकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हानिहाय पालकमंत्री नियुक्त केले असून, दीपक केसरकर यांच्याकडे मुंबई शहरची जबाबदारी देण्यात आली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी सरकारमधील आपले ‘वजन’ पुन्हा एकदा सिद्ध केले असून, सहा जिल्ह्यांचे पालकत्व स्वीकारले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी नवीन पालकमंत्र्यांची जिल्हानिहाय यादी जाहीर केली. त्यानुसार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, भंडारा, गडचिरोली या जिल्ह्यांचे पालकमंत्री असतील. नियोजन मंत्री म्हणून त्यांच्याकडे या जिल्ह्यांची जबाबदारी देण्यात आली आहे. संभाजीनगर राखण्यात शिंदे गटाला यश आले आहे. शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या छत्रपती संभाजीनगरची जबाबदारी संदिपान भुमरे यांच्याकडे देण्यात आली आहे. त्याशिवाय गुलाबराव पाटील यांचीही मागणी पूर्ण करण्यात आली असून, जळगावसह बुलढाण्याचे पालकत्व त्यांच्याकडे असेल. ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे धुळे, लातूर आणि नांदेड या भाजपसाठी महत्त्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी देण्यात आली आहे.

(हेही वाचा पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणाऱ्यांना सोडणार नाही – देवेंद्र फडणवीसांचा इशारा)

तुमच्या जिल्ह्याचा पालकमंत्री कोण?

१) राधाकृष्ण विखे पाटील – अहमदनगर, सोलापूर,
२) सुधीर मुनगंटीवार – चंद्रपूर, गोंदिया
३) चंद्रकांत पाटील – पुणे
४) विजयकुमार गावित – नंदुरबार
५) गिरीश महाजन – धुळे, लातूर, नांदेड
६) गुलाबराव पाटील – बुलढाणा, जळगाव
७) दादा भुसे – नाशिक
८) संजय राठोड – यवतमाळ, वाशिम
९) सुरेश खाडे – सांगली
१०) संदिपान भुमरे – छत्रपती संभाजीनगर
११) उदय सामंत – रत्नागिरी, रायगड
१२) तानाजी सावंत – परभणी, धाराशिव
१३) रवींद्र चव्हाण – पालघर, सिंधुदुर्ग
१४) अब्दुल सत्तार – हिंगोली
१५) दीपक केसरकर – मुंबई शहर, कोल्हापूर
१६) अतुल सावे – जालना, बीड
१७) शंभूराज देसाई – सातारा, ठाणे
१८) मंगलप्रभात लोढा – मुंबई उपनगर

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.