CM Eknath Shinde : लोकसभा निवडणुकीत अपेक्षित यश न मिळणे ही सामूहिक जबाबदारी

161
Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ

लोकसभा निवडणुकीतील (Lok Sabha Elections) पराभव ही सामूहिक जबाबदारी आहे. आम्ही तिन्ही पक्षांनी निवडणुकीत एकत्र काम केले होते. त्यामुळे पराभवाची कारणमिमांसा केली जाईल, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी व्यक्त केली. लोकसभा निवडणुकीच्या निकालात महाराष्ट्रात महायुतीचे अपेक्षेपेक्षा कमी खासदार निवडून आले. त्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांनी राज्य सरकारमधून पदमुक्त होणार असल्याचे संकेत दिले. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपले मत व्यक्त केले. (CM Eknath Shinde)

शिंदे (CM Eknath Shinde) पुढे म्हणाले की, मतांची टक्केवारी पाहिली तर मुंबईत महायुतीला दोन लाखांहून अधिक मते मिळाली. संविधान बदलणार हे नॅरेटिव्ह म्हणजे विरोधकांनी खोट बोला रेटून बोला या उद्देशाने तात्पुरते नॅरेटिव्ह सेट केले. मोदी हटाव असा नारा विरोधक करत होते. मात्र मतदारांनी या विरोधकांना तडिपार केले. मोदीजींकडे विकासाचा अजेंडा आहे. गेल्या दोन वर्षात राज्यात अनेक चांगले निर्णय सरकारने घेतले. या निवडणुकीत जागा कमी झाल्या असल्या तरी मते वाढली आहे. (CM Eknath Shinde)

(हेही वाचा – Novak Djokovic : रॉजर फेडररचा विक्रम मोडल्यानंतर जोकोविचची दुखापतीमुळे फ्रेंच ओपनमधून माघार)

देवेंद्रजी (DCM Devendra Fadnavis) यांनी भावना व्यक्त केल्या असतील तरी मी त्यांच्याशी बोलेन. अपयशाने खचून जाणारे आम्ही लोक नाही. जनतेची दिशाभूल करुन मते मिळवण्याचा प्रयत्न केला हे तात्पुरते यश आहे. आम्ही विकासाचा अजेंडा घेऊन पुढे जाणारे आहोत. विरोधकांच्या अपप्रचारामुळे जनतेचा संभ्रम दूर कमी करण्यात आम्ही कमी पडलो. मुंबईत महायुतीला दोन लाख अधिक मते मिळाली. मूळ मतदार महायुतीबरोबर असल्याचे दिसून आले, असेही शिंदे म्हणाले. (CM Eknath Shinde)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.