CM Eknath Shinde यांचे मविआला थेट आव्हान; म्हणाले…

73
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी महाविकास आघाडीला थेट समोरासमोर येऊन चर्चा करण्याचे आव्हान दिले आहे. वैजापूरमध्ये रमेश बोरनारे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत बोलताना त्यांनी यासंदर्भात भाष्य केले. महाविकास आघाडीने अडीच वर्षात काय केले आणि आम्ही काय केले, याची खुली चर्चा करायला मी तयार आहे. मात्र, विरोधक हे आव्हान स्वीकारायला नाही. कारण त्यांनी अडीच वर्षांत काहीही केले नाही, अशी टीका मुंख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.

अडीच वर्षे सरकार होते स्थगित

महाविकास आघाडीच्या सरकारने अडीच वर्षांत अनेक विकास प्रकल्पांना स्थगिती दिली. राज्यात अडीच वर्षे स्थगिती सरकार होते. त्यावेळी मंदिरे इतर प्रार्थनास्थळेही बंद केली होती. मात्र, महायुतीचे सरकार आले आणि आपण राज्यातील सगळी मंदिरे उघडली. तसेच स्थगिती मिळालेल्या सगळ्या योजना पुन्हा सुरु केल्या, असेही मुख्यमंत्री शिंदे  (CM Eknath Shinde) म्हणाले. 

(hहेही वाचा हेलिकॉप्टरमधून उतरताच बॅग तपासल्यावर Uddhav Thackeray संतापले )

मविआने चोरला वचननामा 

मुख्यमंत्री शिंदे यांनी जाहीरनाम्याच्या मुद्द्यावरूनही महाविकास आघाडीला लक्ष्य केले. मविआने आमचा वचननामा चोरून त्यांचा जाहीरनामा प्रकाशित केला आहे. कॉपी पेस्ट करून जाहीरनामा बनवता येत नाही, हे त्यांना माहिती नाही”, अशी टीका त्यांनी केली.

महायुतीचा जाहीरनामा म्हणजे फक्त ट्रेलर

“महायुतीचा जाहीरनामा म्हणजे फक्त ट्रेलर आहे. संपूर्ण सीनेमा अजून यायचा बाकी आहे. आम्ही लाडकी बहीण योजनेत महिलांना १५०० वरून २१०० रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही शेतकरी सन्मान योजनेचा निधीदेखील वाढवला आहे. प्रत्येकाच्या मुलभूत गरजा भागवण्यासाठी सरकारने प्रयत्न केले आहेत”, असेही त्यांनी  (CM Eknath Shinde) सांगितलं.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.