CM Eknath Shinde : महायुतीमधील समन्वय अधिक वाढायला हवा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची अपेक्षा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या बैठकीत बोलताना मराठा आरक्षण मिळवून देण्यासाठी राज्य शासनाने नक्की काय पावले उचलली आहेत त्याची माहिती दिली.

127
Mahayuti : अजित पवार नमती भूमिका घेणार; फक्त ७५ जागांची मागणी

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमधील तिन्ही पक्षांमधील समन्वय अधिक वाढायला हवा अशी अपेक्षा महायुतीतील तिन्ही पक्षांच्या संयुक्त बैठकीत करण्यात आली. राज्यातील महायुती सरकार मधील शिवसेना,भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही प्रमुख घटकपक्षांची बैठक शुक्रवारी संध्याकाळी उशिरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी पार पडली. बैठकीत राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या आंदोलनावर मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केल्याचे समजते.या बैठकीला या पक्षांचे मंत्री, आमदार आणि खासदार आवर्जून उपस्थित होते. (CM Eknath Shinde)

राज्यातील मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर या तिन्ही पक्षांची संयुक्त बैठक वर्षा बंगल्यावर पार पडली.यात सर्वप्रथम बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षण आंदोलन आणि त्या अनुषंगाने राज्य शासनाने केलेल्या उपाययोजनांचा आढावा घेतला. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आपले मत मांडले. यात प्रामुख्याने तिनही घटक पक्षातील समन्वय अधिक वाढवा यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता त्यांनी बोलून दाखवली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या बैठकीत बोलताना मराठा आरक्षण मिळवून देण्यासाठी राज्य शासनाने नक्की काय पावले उचलली आहेत त्याची माहिती दिली.मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन सुरु असताना आपण वारंवार त्यांच्याशी संपर्क साधून संवाद साधल्याचे त्यांनी सांगितले. आरक्षण मिळण्याबाबत येणाऱ्या तांत्रिक आणि कायदेशीर अडचणी त्यांना समजावून सांगितल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.अखेर राज्य शासनाने पुढाकार घेऊन आपले शिष्टमंडळ त्यांच्याशी चर्चा करायला पाठवले.त्यावेळी माजी न्यायाधीश तसेच मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांनी त्यांना कायदेशीर बाबी समजावून सांगितल्यानंतर जरांगे यांनी आपले उपोषण मागे घेतले.तसेच राज्यातील मराठा आंदोलनादरम्यान जाळपोळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले असल्याचेही त्यांनी सांगितले.

(हेही वाचा : Mumbai Metro : मुंबईत दाखल झाली नववी मेट्रो ,लवकरच सुरु होणार ट्रायल रन)

मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या आंदोलनाच्या अनुषंगाने मराठ्यांना वेगाने कुणबी प्रमाणपत्र वाटप करण्यासाठी  राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांच्या सोबत बैठक घेऊन या कामाला अधिक गती देण्याचे निर्देशही दिले असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.तसेच त्यासाठी लागणारे अतिरिक्त मनुष्यबळ आणि इतर सहकार्य करण्याचे निर्देशही दिल्याचे त्यांनी सांगितले.यासोबतच माजी न्या. संदीप शिंदे समितीची कार्यकक्षा अधिक वाढवण्याचे निर्देश दिले असल्याचेही त्यांनी उपस्थित आमदार आणि खासदारांना सांगितले. सरकार घेत असलेले हे निर्णय लोकांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न सर्व आमदार आणि खासदारांनी करावा अशी अपेक्षाही यावेळी मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.

तसेच मराठा आंदोलन आणि इथून पुढे लोकसभा निवडणुकीपर्यंत या तिन्ही पक्षामधील समन्वय अधिक वाढवण्याची गरज मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केली.तसेच सरकारने घेतलेले निर्णय आणि नवीन प्रकल्पांची माहिती सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहचवण्या साठी मंत्री आणि आमदारांनी दौरे करावेत.गाव पातळीवर असलेल्या कार्यकर्त्यांमध्ये समन्वय वाढवा यासाठी प्रयत्न करावेत असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले. यानंतर भाजप नेते आ.आशिष शेलार यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.