महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नक्षलवाद्यांच्या हाती देऊन त्यांना जीवे मारले जाणार होते. असा गौप्यस्फोट आणि खळबळजनक विधान शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे. मात्र एकनाथ शिंदेचा असा घातपात घडविण्यात कुणाचा सहभाग होता? हे विधान करताना आपण हे विधान जबाबदारीने करत असल्याचेही त्यांनी सांगितले. (CM Eknath Shinde)
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हत्येच्या कटाबाबत गौप्यस्फोट करताना आमदार संजय गायकवाड म्हणाले, “एकनाथ शिंदे यांना दुसरं काहीही दिलं जाणार नव्हतं, त्यांना मृत्यू दिला जाणार होता. नक्षलवाद्यांच्या हातून त्यांचं एन्काऊंटर केलं जाणार होतं. मुख्यमंत्र्यांना नक्षलींच्या ताब्यात देऊन हत्या घडवून आणण्याचं त्यांचं स्वप्न धुळीस मिळालं आहे. मी अत्यंत जबाबदारीने हा गौप्यस्फोट करत आहे.
(हेही वाचा : Action by ED: विवो आणि लाव्हा कंपनीच्या अधिकाऱ्यांना ईडीकडून अटक)
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना चकमक घडवून जीवे मारलं जाणार होतं, असं खळबळजनक विधान शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी केलं आहे. तसेच मी जबाबदारपणे हा गौप्यस्फोट करत आहे, असंही गायकवाड यांनी म्हटलं आहे. संजय गायकवाड यांच्या विधानानंतर राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे. शिवाय एकनाथ शिंदेंचं एन्काऊंटर घडवण्यात कुणाचा सहभाग होता? याबद्दल सूचक वक्तव्यही गायकवाड यांनी केलं आहे. (CM Eknath Shinde)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community