‘सच्चा, प्रामाणिक आणि निष्ठावंत लोकप्रतिनिधी हरपला’; गिरीश बापटांच्या निधनानंतर मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केल्या भावना

137

पुण्यातील भाजपचे खासदार गिरीश बापट यांचे बुधवारी निधन झाले. ते ७२ वर्षांचे होते. त्यांची प्रकृती अनेक दिवसांपासून चिंताजनक होती. उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पुणे महानगरपालिकेत नगरसेवक, आमदार, मंत्री ते खासदार असा त्यांचा प्रवास राहिला आहे. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच अनेक मान्यवरांनी तीव्र दु:ख व्यक्त केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही त्यांच्या निधनानंतर शोक व्यक्त करत एक सच्चा, प्रामाणिक आणि निष्ठावंत लोकप्रतिनिधी हरपला, अशी भावना व्यक्त केली.

एका मराठी वृत्तवाहिनीसोबत बोलत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, ‘अतिशय दुख:द घटना आणि दुख:द  बातमी माझ्यासाठी आहे. एक सच्चा, प्रामाणिक आणि निष्ठावंत लोकप्रतिनिधी हरपला. गेले अनेक वर्ष गिरीश बापट या राजकारणात होते. त्यांची कारकीर्द राष्ट्रीय स्वयंसेवक, नगरसेवकापासून सुरू झाली. पुढे ते मंत्री आणि खासदार झाले. मंत्रीमंडळात काम करताना आम्ही शेजारीच बसायचो. माझ्या अतिशय जवळचे मित्र होते. माझे त्यांचे अतिशय स्नेहाचे संबंध होते. त्यांच्या जाण्याने भाजपची तर हानी झालीच आहे, परंतु एक सच्चा लोकप्रतिनिधी हरपलाय. समाजाची देखील मोठी हानी झाली आहे. आजारी असताना देखील मी त्यांना कसब्याच्या पोटनिवडणूकीत पाहिले. पहिल्यांदा राष्ट्र, मगनंतर संघटना आणि व्यक्ती. एक सच्चा लोकप्रनिधी हरपल्यामुळे समाजातील न भरून येणारी हानी झाली आहे. मी त्यांना माझ्या आणि शिवसेनेच्यावतीने भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो.’

(हेही वाचा – भाजप खासदार गिरीश बापट यांचे निधन)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.