उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची आणि प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीची युतीची अखेर सोमवारी घोषणा करण्यात आली. उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकरांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन शिवशक्ती आणि भीमशक्ती युतीची घोषणा केली. त्यामुळे आता महाविकास आघाडीत चौथा भिडू समाविष्ट झाला आहे. आगामी निवडणुका ठाकरे गट आणि वंचित आघाडी एकत्रिपणे लढणार आहे. दरम्यान शिवशक्ती-भीमशक्तीच्या युतीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका वाक्यात पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
शिवशक्ती आणि भीमशक्तीची युती होण्याआधी मुख्यमंत्री शिंदे आणि प्रकाश आंबेडकरांची भेट झाली होती. त्यामुळे राज्यातील राजकारणात शिंदे गट आणि भीमशक्तीच्या युतीबाबत चर्चा सुरू झाली. पण तसं काही झालं नाही आणि अखेर वंचित बहुजन आघाडीने ठाकरे गटाचा हात पकडला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकरांच्या युतीला शुभेच्छा दिल्या आहेत.
दरम्यान शिवशक्ती-भीमशक्तीची युती जाहीर करताना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘बाळासाहेब ठाकरे यांचा आज जन्मदिवस आहे. प्रकाश आंबेडकर आणि आम्ही पुढची वाटचाल पुढे घेऊन जाण्यासाठी एकत्र आलो आहोत. माझे आजोबा आणि प्रकाश आंबेडकर यांचे आजोबा हे स्नेही होते. दोन्ही पिढ्यांचे वारसदार आणि जीवाला जीव देणारे सहकारी एकत्र येऊन देशाचा प्रथम विचार करुन पुढे जाणार आहोत.’
(हेही वाचा – ‘पवारांसोबतच भांडण शेतातलं नाही, दिशेचं भांडण आहे; पण आमच्यासोबत ते येतील ही अपेक्षा’)
Join Our WhatsApp Community