शुक्रवार १९ मे २०२३ रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेकडून (Demonetisation) एक मोठा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार बाजारातून आता दोन हजाराच्या नोटा बंद (Demonetisation) होणार आहेत. ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत या दोन हजाराच्या नोटा वापरता येणार असल्याचे आरबीआयने सांगितले आहे. नागरिकांना ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत दोन हजार रुपयांच्या नोटा बँकेत जमा करता येणार आहेत. नागरिकांना एकावेळी दोन हजार रुपयांच्या केवळ १० नोटा (२० हजार रुपये) जमा करता येणार आहेत.
RBI to withdraw Rs 2,000 currency notes from circulation; the notes will continue to be legal tender till September 30: Statement
— Press Trust of India (@PTI_News) May 19, 2023
(हेही वाचा – Demonetisation : पुन्हा नोटबंदी; २ हजाराची नोट ‘या’ दिवसापासून होणार बंद?)
रिझर्व्ह बँकेनं घेतलेल्या या निर्णयानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी एका वाक्यात प्रतिक्रिया दिली आहे. आरबीआयच्या निर्णयाबद्दल विचारलं असता एकनाथ शिंदे म्हणाले, “आरबीआयने (Demonetisation) निर्णय घेतला असेल तर तो काही विचाराअंतीच घेतला असेल.” प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.
हेही पहा –
यापूर्वी २०१६ साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रात्री अचानक नोटबंदी (Demonetisation) जाहीर केली होती, त्यावेळी त्यांनी ५०० आणि १००० रुपयांची नोट मागे घेतली होती. शुक्रवार, १९ मे रोजी आरबीआयने आता २ हजार रुपयांची नोट मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अनेकांना मागील नोट बंदीची आठवण आली आहे.
Join Our WhatsApp Community