‘रिक्षाच्या स्पीडपुढे मर्सिडीजचा स्पीड फिका पडला…’ मुख्यमंत्र्यांचं ठाकरेंना प्रत्युत्तर

127

सोमवारी विधीमंडळात पार पडलेल्या बहुमत चाचणीत शिंदे सरकारचा विजय झाला. त्यानंतर अभिनंदनपर भाषणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनमोकळं भाषण करत सगळ्यांची मनं जिंकली. शिंदेंच्या या भाषणाची चर्चा होत असतानाच माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदेंवर निशाणा साधला. रिक्षावाल्याची रिक्षा सुसाट होती, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी शिंदेंवर टीका केली. त्याला आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्वीट करत उत्तर दिले आहे.

मुख्यमंत्र्यांचे प्रत्युत्तर

विधीमंडळात बोलताना रिक्षावाल्याची रिक्षा सुसाट पळत होती, तिला ब्रेक नव्हता, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर केली. त्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्वीट करत चोख प्रत्युत्तर दिले आहे. ‘रिक्षाच्या स्पीडपुढे मर्सिडीजचा स्पीड फिका पडला, कारण हे सर्वसामान्यांचं सरकार आहे’, असे ट्वीट करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे.

(हेही वाचाः रिक्षावाल्याच्या रिक्षेला ब्रेक नव्हता, उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना टोला)

फडणवीसांनीही लगावला टोला

काँग्रेस पक्षाने देखील पंतप्रधान मोदींना चायवाला म्हणून हिणवलं. पण मोदींनी काँग्रेसला असं पाणी पाजलं त्यामुळे काँग्रेसची अवस्था आज काय आहे, हे आपण बघतोय. आणि जर आम्ही रिक्षावाले, पान टपरीवाले, चहा टपरीवाले, रस्त्यावरचे विक्रेते असलो तरी त्याचा आम्हाला अभिमान आहे. या देशात स्वाभिमानाने जो जगतो तोच खरा राजा असतो, असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे.

(हेही वाचाः आम्ही रिक्षावाले असल्याचा आम्हाला अभिमान, फडणवीसांचे उद्धव ठाकरेंना चोख प्रत्युत्तर)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.