शासन आपल्या दारी हे अभियान राज्यामध्ये राबविण्यात आले असून या अभियानाच्या माध्यमातून राज्यामध्ये २ कोटी ६० लाख नागरिकांना विविध योजनांचा लाभ देण्यात आला असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. सिडको मैदान येथे आयोजित महासंस्कृती मोहत्सव कार्यक्रमाचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी मुख्यमंत्री शिंदे (CM Eknath Shinde) बोलत होते.
(हेही वाचा – Acharya Pramod Krishnam : शिस्तभंग आणि पक्षविरोधी कारवाया, कॉंग्रेस कडून आचार्य प्रमोद कृष्णम यांची हकालपट्टी)
काय म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ?
एक रुपयात पीक विमा देणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य –
महिलांना सवलतीच्या दरात राज्य परिवहन महामंडळाच्या बसमध्ये प्रवास, महिला सक्षमीकरण, लेक लाडकी, नमो शेतकरी सन्मान योजनेच्या माध्यमातून शेतकरी वर्गना १२ हजार रुपयाचे अनुदान देण्यात येते. शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विमा देणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे. जे सिंचनाचे प्रकल्प बंद होते ते सुरु करण्यात आले आहेत. असे अनेक लोकहिताचे निर्णय या शासनाने घेतले. हे सर्व निर्णय राज्यातील जनतेसाठी सर्व समाज घटकासाठी घेतले असून वैयक्तिक लाभाचा कोणताही निर्णय या शासनाने घेतला नाही. पायाभूत सुविधा निर्माण करण्यामध्ये तसेच परदेशी गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र हे देशातील प्रथम क्रमांकाचे राज्य असून २२ कि.मी लांबीचा शिवडी – नाव्हा शेवा ट्रान्स हर्बर लिंक या सागरसेतूचे लोकार्पण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. हा प्रकल्प पर्यावरण पूरक प्रकल्प आहे.हा सर्व विकास साधला जात असताना आपल्या संस्कृतीशी आपले नाते अधिक घट्ट व्हावे, यासाठी महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन राज्यात करण्यात आले. (CM Eknath Shinde)
महासंस्कृती महोत्सव व महानाट्याचे आयोजन –
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५० व्या राज्यभिषेक वर्षानिमित्त तसेच त्यांच्या जिवनावर आधारीत त्यांचे विचार महानाट्याद्वारे जिल्ह्यातील जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी महानाट्याचे आयोजन तसेच राज्यातील विविध प्रांतातील संस्कृतीचे अदान प्रदान, स्थानिक कलाकारांसाठी हक्काचे व्यासपीठ, कला व संस्कृतीचे जतन संवर्धन आणि स्वातंत्र्य लढ्यातील ज्ञात, अज्ञात क्रांतीवीरांच्या शौर्यगाथा जिल्ह्यातील नागरीकापर्यंत पोहचविण्यासाठी महासंस्कृती महोत्सव व महानाट्याचे आयोजन करण्यात आले. (CM Eknath Shinde)
(हेही वाचा – Tina Munim Ambani : जाणून घ्या बॉलिवुड अभिनेत्री आणि अनिल अंबानी यांच्या पत्नी टीना मुनीम अंबानी यांच्याबद्दल)
यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम, खासदार राजेंद्र गावित ,आमदार रविंद्र फाटक, जिल्हाधिकारी गोविंद बोडके, जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे, पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष भागडे उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर आदि मान्यवर उपस्थित होते. (CM Eknath Shinde)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community