अयोध्येतील राम मंदिर उभारणे आणि काश्मीरमधील ३७० कलम हटवणे ही स्वर्गीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची दोन्ही स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूर्ण केली असून आज बाळासाहेब जिवंत असते तर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली असती, असे मत (CM Eknath Shinde) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. शिवसेनेच्या राज्यव्यापी शिवसंकल्प अभियानाची तिसरी सभा रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील राजापूर येथे पार पडली. या सभेत बोलताना त्यांनी हे मत व्यक्त केले. या सभेला राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, उद्योग मंत्री उदय सामंत यांसह शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
(हेही वाचा – Ravindra Waikar ED : ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांच्या घरी ईडीची धाड; अडचणीत वाढ)
राम मंदिराच्या उद्घाटनाचे आमंत्रण मला मिळाले आहे – मुख्यमंत्री
अयोध्येत राम मंदिर तयार करणे आणि काश्मीरमधील ३७० कलम हटवणे ही स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची स्वप्ने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूर्ण केली आहेत. मात्र आज त्यांच्या हेतुवर शंका घेतली जात आहे. त्यांच्याबद्दल ‘मंदिर वही बनाएंगे, तारीख नही बताएंगे’ अशी टीका करण्यात आली पण मोदींनी मंदिरही बांधले आणि २२ जानेवारी ही तारीख देखील जाहीर केली. आता राम मंदिराच्या उद्घाटनाचे आमंत्रण मला मिळाले असून या कार्यक्रमासाठी अयोध्येला जाणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी (CM Eknath Shinde) सांगितले.
(हेही वाचा – CM Eknath Shinde : युवा महोत्सवाच्या माध्यमातून नाशिकची जागतिकस्तरावर ब्रॅण्डिंग करण्याची संधी)
देश जगभरात नावलौकिक कमावत आहे –
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश जगभरात नावलौकिक कमावत आहे. राज्य सरकारला त्यांनी पूर्ण सहकार्य केले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत परदेशात जाऊन देशाची बदनामी करणारा माणूस पंतप्रधान म्हणून हवा की देशाला सर्वस्व देणारा माणूस पंतप्रधानपदी हवा ते आपल्याला ठरवायचे आहे. त्यामुळे मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी अब की बार, मोदी सरकार, ४५ पार हे आपले घोषवाक्य असून त्यासाठी कामाला लागण्याचे आवाहन शिवसैनिकांना केले. आगामी लोकसभा निवडणुकीत ४५ हुन अधिक जागा आपल्याला जिंकायच्या असल्याचे सांगत यासाठी महायुतीचे हात बळकट करण्याचे आवाहन मुख्यमंत्री (CM Eknath Shinde) यांनी केले आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community