मुख्यमंत्री अ‍ॅक्शन मोडमध्ये, पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी तातडीने विदर्भ दौऱ्यावर

138

गेल्या दोन ते तीन दिवसांपासून गडचिरोलीसह विदर्भातील काही भागात मुसळधार पाऊस कोसळत आहे. यामुळे आगामी तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता देखील वर्तविण्यात आली आहे. तीन दिवसांचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. अशातच मुसळधार पावसामुळे गडचिरोतील नदी, नाले आणि ओढ्यांना पूर आला आहे. यापार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून खबरदारीची उपाययोजना करण्यात येत आहे. या पूरपरिस्थितीची पाहणी आणि आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे तात्काळ विदर्भ दौऱ्यावर जाणार आहे.

(हेही वाचा – शिंदे गटाचे प्रतोद थोडक्यात बचावले, मुंबईतील फ्री वे-वर ७ गाड्यांची धडक)

अतिवृष्टी, पूरग्रस्त भागाचा मुख्यमंत्री करणार पाहणी दौरा

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी ते नागपूरला पोहोचून तेथूनच गडचिरोली दौऱ्यावर जाणार आहेत. एकनाथ शिंदे हे अतिवृष्टी, पूरग्रस्त भागाचा पाहणी दौरा करणार आहेत. त्यानंतर संध्याकाळी साडेसहा वाजता पूर्ण परिस्थितीबाबत गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा प्रशासनासोबत आढावा बैठक घेणार आहेत. मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदेंचा हा पहिला विदर्भ दौरा असणार आहे. मविआ सरकारमध्ये एकनाथ शिंदे हे गडचिरोलीचे पालकमंत्री होते. आता ते मुख्यमंत्री म्हणून गडचिरोलीचा दौरा करणार आहे.

NDRF आणि SDRF च्या पथकाला सूचना

गेल्या ४८ तासांपासून गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे नद्या, नाल्यांचा पूर आला आहे. तर काही ठिकाणी झाडे आणि ट्रक वाहून जाण्याच्या घटना घडल्या आहेत. गडचिरोतील सततच्या पावसामुळे सरकारी कार्यालये आणि अत्यावश्यक सेवा-सुविधा वगळता सर्व दुकानं आणि सेवा बंद राहणार आहेत, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. तर शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली असून NDRF आणि SDRF च्या पथकाला देखील सूचना देण्यात आल्या आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.