राज्याचे पावसाळी अधिवेशन येत्या बुधवारपासून सुरू होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर मंगळवारी संध्याकाळी ५ वाजता सह्याद्री अतिथीगृहावर चहापानाच्या कार्यक्रमाच आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर राज्य मंत्रीमंडळाची बैठकही होणार आहे. खातेवाटपानंतरची ही पहिली बैठक असणार असून यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद होणार आहे.
(हेही वाचा – दोन रूपयांनी दूध महागलं! ‘या’ तारखेपासून होणार दरवाढ)
दरम्यान, शिवसेनेत अभूतपूर्व बंड झाले आणि एकनाथ शिंदे शिवसेनेतील बहुसंख्य आमदार घेऊन पक्षातून वेगळे झाले. त्यानंतर शिवसेनेत ठाकरे आणि शिंदेंचे दोन गट पडल्याचे दिसले. या दोघांमधील वादाची ठिणगी थेट सर्वोच्च न्यायालायात पोहोचली आहे. मात्र आता ठाकरे आणि शिंदे आमने-सामने येण्याच्या चर्चा रंगताना दिसताय. याचं कारण म्हणजे मुख्यमंत्री शिंदेंनी ठाकरेंच्या शिवसेनेला एक पत्र लिहिले आहे. या पत्राद्वारे त्यांनी चहापानासाठी शिवसेनेला आमंत्रित केले आहे.
काय म्हटले शिंदेंनी पत्रात…
मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांना हे पत्र लिहिले आहे. पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित चहापानाचं आमंत्रण या पत्राद्वारे देण्यात आले आहे. या निमित्ताने महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टीने आपल्याबरोबर अनौपचारिक, मनमोकळी, सौहार्दपूर्ण वातावरणात चर्चा व्हावी, या हेतूने निमंत्रित करत असल्याचे पत्रात लिहिलेले आहे. यादरम्यान, सुनील प्रभू असे म्हणाले की, परंपरेनुसार मुख्यमंत्री विधिमंडळातील ज्येष्ठ सदस्यांना अधिवेशनाच्या पूर्व संध्येला चहापानासाठी निमंत्रित करतात. तसेच मलाही निमंत्रण पत्र आले आहे. मात्र जायचे की नाही याबाबत माहविकास आघाडीच्या बैठकीत आम्ही निर्णय घेऊ.
Join Our WhatsApp Community