आज १९ फेब्रुवारी रोजी तारखेनुसार, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती (Shiv Jayanti 2024) आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही राज्यासह देशात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे. राज्यातील शिवप्रेमींमध्ये उत्साह दिसून येत आहे. अशातच शिवनेरी किल्ल्यावर (CM Eknath Shinde) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी महाराजांचा पाळणा हलवला.
(हेही वाचा – Shiv Jayanti 2024 : शिवनेरी किल्ल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी महाराजांचा पाळणा हलवला)
शिवजन्मोत्सवाच्या वेळी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित –
शिवजन्मस्थळाच्या उत्तरेला अभिवादन सभेचा मंडप उभारण्यात आला आहे. शिवजन्मोत्सव सोहळ्यासाठी (CM Eknath Shinde) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थिती लावली. गडावरील शिवजन्मोत्सव सोहळ्याचा कार्यक्रम मराठा सेवा संघाच्या वतीने करण्यात आला. यावेळी शासकीय मानवंदना, मर्दानी खेळ; तसेच शिवचरित्रावरील प्रबोधनात्मक पोवाड्याचे सादरीकरण करण्यात आले.
शिवनेरी किल्ल्यावरून दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी मनोगत व्यक्त करुन हे राज्य छत्रपती शिवरायांच्या विचारांवर चालणारं राज्य आहे, असं सांगत राज्य सरकार राबवत असलेल्या उपक्रमांबद्दल माहिती दिली. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी आपलं मनोगत व्यक्त करतांना मराठा आरक्षणाविषयी भाष्य केले.
(हेही वाचा – Chhatrapati Shivaji Maharaj : ज्यांनी वयाच्या १५व्या वर्षी जिंकला होता गड ते शिवराय ‘छत्रपती’ कसे झाले?)
छत्रपती श्री शिवाजी महाराज जन्मोत्सव सोहळा
🗓️ 19-02-2024📍किल्ले शिवनेरी, ता. जुन्नर https://t.co/8jFdNJ3q9S
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) February 19, 2024
काय म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) बोलताना म्हणाले की, शिवछत्रपतींचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून जे काही करता येईल, ते आम्ही करण्याचा प्रयत्न करत आहोत. मागे आम्ही काश्मीरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला. पाकिस्तानकडे नजर रोखून असलेल्या पुतळ्याकडे बघून भारताकडे वाकड्या नजरेने बघण्याची कुणाची हिंमत होणार नाही.
शिवरायांना अभिप्रेत असलेलं सुराज्य आपल्याला निर्माण करायचं आहे – मुख्यमंत्री
मुख्यमंत्री (CM Eknath Shinde) पुढे म्हणाले, शासनाने दांडपट्टा या शस्त्राला राज्यशस्त्र म्हणून घोषित केले आहे. तसेच सुधीर मुनगंटीवार हे लंडनहून वाघनखं महाराष्ट्रात आणणार आहोत. शिवरायांना अभिप्रेत असलेलं सुराज्य आपल्याला निर्माण करायचं आहे. आदिवासींसाठीही राज्य शासनाने मोठ्या योजना हाती घेतल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
(हेही वाचा – Land Jihad : मीरा भाईंदरमध्ये लँड जिहाद; दर्ग्याच्या नावाखाली सरकारी जमीन हडपण्याचा प्रयत्न उधळवला)
मराठा आरक्षणाबद्दल बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की,
उद्या (मंगळवार, दि. २०) विधीमंडळाचं विशेष अधिवेशन बोलावलं आहे. ओबीसी आणि इतर समाजघटकाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी हे विशेष अधिवेशन घेण्यात येणार आहे. उद्याच्या अधिवेशनातून मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याचं एकनाथ शिंदेंनी जाहीर केलं. (CM Eknath Shinde)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community