राज्यात महाविकास आघाडीचे सरकार कोसळले आणि शिंदे सरकार स्थापन झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह एकूण ५० आमदार आणि भाजपाने एकत्रित येत महाराष्ट्रात सरकार स्थापन केले. यामध्ये हिंदुत्वाच्या मुद्द्यावर एकत्र येत मनसेच्या एका आमदाराने विधानसभेत भाजपा आणि शिंदे गटाच्या बाजूने मतदान केले. दरम्यान, शिवसेनेतील नाराज असलेले आमदरा बंडखोरी करत शिंदे गटात सहभागी झाले. इतकेच नाही तर शिंदे गटात सहभागी झाल्यानंतर आता थेट राज ठाकरेंच्याही भेटीगाठी घेऊ लागले आहेत. एकनाथ शिंदे समर्थक आमदार सदा सरवणकर यांनी आज, बुधवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची शिवतीर्थावर भेट घेतली. या भेटीनंतर शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात चर्चांणा उधाण आले आहे.
(हेही वाचा – मुख्यमंत्री-पवार यांची झाली भेट? एकनाथ शिंदेंनीच केले स्पष्ट)
भेटीनंतर काय म्हणाले सरवणकर
राज्यात शिवसेना आणि भाजप सरकार स्थापन झाले आहे. राज ठाकरे हे हिंदु पुरस्कर्ते आहेत. राज ठाकरे हे हिंदु जननायक आहेत. माझे शेजारी सुद्धा आहेत. त्यांची तब्येत बरी नसतानाही त्यांनी मला वेळ दिल्याबद्दल मी आभारी आहे, अशी प्रतिक्रिया सरवणकरांनी राज ठाकरेंच्या भेटीनंतर दिली.
महाराष्ट्राचे हिंदूजननायक, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष व आमचे दादरकर आदरणीय श्री. राजसाहेब ठाकरे यांची आज शिवतीर्थ या त्यांच्या निवासस्थानी जाऊन सदिच्छा भेट घेतली.
माझ्यासोबत यावेळी @samadhan234 @SandeepDadarMNS व @PriyaSarvankar व इतर पदाधिकारी उपस्थित होते pic.twitter.com/XxYyj0a0Do
— Sada Sarvankar (@misadasarvankar) July 6, 2022
माध्यमांशी बोलताना सदा सरवणकर यांनी राज ठाकरेंच्या भेटीते कारण स्पष्ट केले आहे. शिवसेनेला टक्कर देण्यासाठी आम्ही एकत्र येत आहोत, अशा चर्चा रंगल्या आहेत. मात्र यामध्ये कोणतेही तथ्य नसल्याचे त्यांनी सांगितले. एक हिंदुत्वाची लढाई आहे. अखंड हिंदू एकत्र करणं आणि त्यासाठीच झगडणं हा मुख्य त्यामागील हेतू आहेत. आगामी निवडणुकीबाबत विचारले असता, त्यांनी हा निर्णय मुख्यमंत्री घेतील, असे सदा सरवणकर यांनी सांगितले.
मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेनेचे कट्टर शिवसैनिक म्हणून ओळखले जाणारे आमदार सदा सरवणकर अचानक शिंदे गटात सहभागी झाल्यामुळे शिवसेनेचा बालेकिल्ला असणाऱ्या दादर परिसरात खळबळ उडाली होती. दरम्यान, सरकार स्थापन झाल्यानंतर आता सर्व शिंदे गटातील आमदार आपल्या-आपल्या मतदारसंघात रवाना झाले आहेत. बुधवारी सकाळी सदा सरवणकर यांनी राज ठाकरेंची भेट घेतली. माहीम मतदार संघाचे आमदार सदा सरवणकर यांनी राज ठाकरेंची सदिच्छा भेट घेतली. या भेटीच्या वेळी सदा सरवणकर यांची मुलगी आणि माजी नगरसेवक असलेला मुलगा समाधान सरवणकर हे देखील उपस्थित होते.
Join Our WhatsApp Community