पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गुरुस्थानी मानणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आता राज्यात मोदी पॅटर्न राबवू पाहत आहेत. मोदींच्या ‘मन की बात’ या लोकप्रिय कार्यक्रमाच्या धर्तीवर शिंदेंनी राज्यात ‘मी मुख्यमंत्री बोलतोय’ या कार्यक्रमाची आखणी केली आहे.
मोदींचा ‘मन की बात’ हा रेडिओवरील प्रयोग यशस्वी ठरल्यानंतर २०१७ साली तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘मी मुख्यमंत्री बोलतोय’ कार्यक्रमातून राज्यातील शेतकरी आणि नागरिकांशी संवाद साधला होता. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंही (CM Eknath Shinde) राज्यातील जनतेशी संवाद साधणार आहेत. महिन्यातून दोन वेळा हा कार्यक्रम प्रसारित होणार आहे.
‘मी मुख्यमंत्री बोलतोय’, हा कार्यक्रम महिन्यातून दोनदा आणि वर्षातून २४ वेळा प्रदर्शित होणार आहे. दूरचित्रवाहिन्या आणि रेडिओवर नव्या स्वरुपातील हा कार्यक्रम दाखवला आणि ऐकवला जाईल. यासाठी ई-निविदा प्रसिद्ध करून संस्थेची निवड करण्याची प्रक्रिया राबवण्यासाठी प्रशासकीय मान्यताही देण्यात आली आहे.
स्वरूप कसे असणार?
– राज्यातील जनता आणि शासन यांच्यातील संवाद अधिक दृढ होण्यासाठी ‘मी मुख्यमंत्री बोलतोय’ या कार्यक्रमाचे आयोजन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत करण्यात येणार आहे.
– राज्यातील जनतेने ई-मेल, व्हॉटस अॅप आणि थेट विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे मुख्यमंत्री या कार्यक्रमातून उत्तरे देतील.
– ‘डिजिटल प्रशासन विषयाच्या अनुषंगाने हा कार्यक्रम दूरचित्रवाणी वाहिन्या आणि ‘आकाशवाणी’वरून प्रसारित करण्यात येणार आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community