सणासुदीच्या पार्श्वभूमीवरच CM Eknath Shinde मुंबई-गोवा महामार्ग पाहणी दौऱ्यावर! अधिकारी लागले कामाला

121
सणासुदीच्या पार्श्वभूमीवरच CM Eknath Shinde मुंबई-गोवा महामार्ग पाहणी दौऱ्यावर! अधिकारी लागले कामाला
सणासुदीच्या पार्श्वभूमीवरच CM Eknath Shinde मुंबई-गोवा महामार्ग पाहणी दौऱ्यावर! अधिकारी लागले कामाला

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) मुंबई गोवा- महामार्गाची (Mumbai Goa- Highway) पाहणी करत आहेत. मुख्यमंत्र्यांच्या पाहणी आधी मुंबई गोवा महामार्गावर खड्डे बुजवण्यात आले. रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात अनेक ठिकाणी रस्त्याची डागडुजी सुरू आहे. गेले 17 वर्ष मुंबई गोवा महामार्गाचे चौपदरीकरण रखडलं आहे. मुख्यमंत्री आणि बांधकाम मंत्र्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवरती खड्डे बुजवण्याचं काम केलं जात आहे.

(हेही वाचा –ST Booking Ganesh Chaturthi : गणेशोत्सवासाठी एसटीने प्रवास करणार आहात ?; बसेस होऊ लागल्या फुल्ल)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण (Ravindra Chavan) सुद्धा यावेळी उपस्थित आहेत. या अगोदर तब्बल 17 वेळा बांधकाम मंत्री रवीद्र चव्हाण यांनी पाहणी दौरा केला आहे. गणेशोत्सवासाठी येणाऱ्या चाकरमान्यांसाठी यावर्षीही खड्ड्यांचं विघ्न पाहायला मिळत आहे. सणासुदीच्या पार्श्वभूमीवरच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई गोवा महामार्गाची पाहणी करणार आहेत. त्यांच्या या दौऱ्याने अधिकाऱ्यांना घाम फुटला आहे. रातोरात सगळी यंत्रणा कामाला लागली आहे. (CM Eknath Shinde)

(हेही वाचा –एक्सप्रेसच्या तांत्रिक बिघाडामुळे Central Railway ची वाहतूक विस्कळीत)

मुख्यमंत्र्यांच्या पाहणीची अधिकाऱ्यांसह-ठेकेदारांना भीती निर्माण झाली आहे. त्यांचा दौरा समजल्यानंतर रातोरात अधिकारी आणि ठेकेदार कामाला लागले आहेत. अधिकारी आणि ठेकेदारांनी खड्डे बुजवले आहेत. एकीकडे सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी-रायगड जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे रातोरात खड्डे बुजवून ते मुसळधार पावसात राहणार किती हा प्रश्नही आहेच. (CM Eknath Shinde)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.