आजचा दिवस म्हणजेच बुधवार ५ जुलै हा दिवस राज्यातील राजकारणासाठी फार महत्वाचा दिवस ठरणार आहे. आज एकाच दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन बैठका होणार आहेत. राष्ट्रवादीसोबतच शिवसेनेतही वेगवान घडामोडी घडत असल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नागपूर दौरा अचानक रद्द झाल्याने चर्चांना उधाण आलं आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंगळवारी (४ जुलै) रात्री उशिरा तडकाफडकी नागपूरहून मुंबईला परतले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा आज गडचिरोलीच्या गोंडवाना विद्यापीठात कार्यक्रम आहे, या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उपस्थित राहणार होते. मात्र मुख्यमंत्री रात्रीच घाईघाईनं मुंबईला परतले. ते आज पुन्हा नागपूरला परतणार होते, मात्र आता त्यांचा नागपूर दौरा रद्द झाल्याची माहिती मिळत आहे. एकीकडे राष्ट्रवादीच्या बैठका तर दुसरीकडे मुख्यमंत्री शिंदे यांचा अचानक रद्द झालेला दौरा यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळातून चर्चांना उधाण आलं आहे. अजित पवार यांच्या बंडामुळे मुख्यमंत्री शिंदे नाराज असल्याचे देखील बोलले जात आहे.
(हेही वाचा – अजित पवारांची साथ, क्षणिक की दीर्घकाळ?)
शिंदे गटाची नाराजी?
अजित पवारांच्या शपथविधीनंतर शिंदे गट नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. अशातच काही दिवसांतच शिंदेंचं मुख्यमंत्रीपद जाऊन अजित पवार मुख्यमंत्री होणार असल्याचे दावे राज्यातील अनेक मोठ्या नेत्यांनी केले आहेत. त्यामुळे शिंदेंचं तडकाफडकी मुंबईला येणं आणि त्यानंतर राष्ट्रपती महाराष्ट्र दौऱ्यावर असूनही दौरा रद्द करणं यांमुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. मुख्यमंत्र्यांनी त्यांचा नागपूर दौरा नेमका का रद्द केला याचे नेमके कारण अजून स्पष्ट झालेली नाही.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community