Baba Siddique यांच्या हत्येनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “या प्रकरणातील…”

245
Baba Siddique यांच्या हत्येनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले,
Baba Siddique यांच्या हत्येनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, "या प्रकरणातील..."

अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते बाबा सिद्दिकी (Baba Siddique Shot Dead) यांच्यावर शनिवारी रात्री वांद्रे परिसरातील खेरवाडी जंक्शनजवळ गोळीबार करण्यात आला. या हल्ल्यात बाबा सिद्दिकी (Baba Siddique) यांचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी याप्रकरणी दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. बाबा सिद्दिकी (Baba Siddique) हे त्यांचा मुलगा झिशान सिद्दिकी (Zeeshan Siddiqui) यांच्या कार्यालयातून निघत असताना त्यांच्यावर हल्ला झाला. या घटनेनंतर आता राज्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. तसेच या या घटनेनंतर राजकीय प्रतिक्रियाही उमटू लागल्या आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Cm Eknath Shinde) यांनीही यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे.

(हेही वाचा-Baba Siddique Shot Dead: … म्हणून Zeeshan Siddiqui थोडक्यात बचावले; काय घडलं निर्मलनगरच्या ऑफिसबाहेर?)

एकनाथ शिंदे म्हणाले, “बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार झाला आहे. ही दुर्दैवी घटना आहे. मी पोलिसांबरोबर चर्चा केली आहे. याप्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यापैकी एक उत्तर प्रदेशचा, तर दुसरा हरियाणाचा आहे. एक आरोपी फरार आहे. मुंबईत कोणत्याही परिस्थिती कायदा सुव्यवस्था बिघडू नये, याची काळजी घेण्याचे निर्देश मी पोलिसांना दिले आहेत. तसेच कोणताही गॅंग डोक वर काढणार नाही, याची खबरदारी घेण्याचा सुचनाही पोलिसांना दिल्या आहेत.” अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली. तसेच या प्रकरणातील आरोपीला कठोर शिक्षा होईल, असंही आश्वासनही त्यांनी दिलं.

नेमकं काय घडलं?
बाबा सिद्दीकी शनिवारी संध्याकाळी त्यांच्या वांद्रे येथील निर्मल नगरमधील ऑफिसमध्ये बसले होते. यावेळी त्यांच्यासोबत त्यांचा मुलगा आमदार झिशान सिद्दीकीही होते. फटाके फोडून बाबा सिद्दीकी घरी जाणार होते. विजयादशमी असल्याने या परिसरातून देवीच्या मिरवणुका जात होत्या. त्यामुळे या परिसरात वाद्यांचा आणि फटाक्यांचा आवाज होता. त्यामुळे ते सव्वा नऊ ते साडेनऊच्या सुमारास ऑफिसमधून बाहेर पडले. फटाके वाजवत असतानाच एक गाडी आली आणि त्यातून तिघे उतरले. (Baba Siddique Shot Dead) या तिघांनी तोंडाला रुमाल बांधलेला होता. गाडीतून उतरताच फटाक्याच्या आवाजात त्यांनी सिद्दीकी यांच्यावर गोळ्या झाडल्या. एकूण पाच राऊंड फायर कण्यात आले. त्यातील एक गोळी बाबा सिद्दीकी यांच्या छातीवर लागली. त्यामुळे ते खाली कोसळले. आजूबाजूच्या लोकांनी तात्काळ धाव घेऊन बाबा सिद्दीकी यांना रुग्णालयात नेले. पण त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. (Baba Siddique Shot Dead)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.