महाराष्ट्रातील पाचव्या टप्प्याचं मतदान (Lok Sabha election) पूर्ण झालं आहे. मात्र या टप्प्यात मतदानाची टक्केवारी अतिशय निराशाजनक राहिली आहे. राज्यात सरासरी 54.33 टक्के मतदान झालं, तर देशात 60.09 टक्के मतदान झाले आहे. सर्वात जास्त मतदान पश्चिम बंगालमध्ये 76.05 तर, महाराष्ट्रात सर्वात कमी 54.33 टक्के मतदान झालं आहे. या प्रकरणाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde ) यांनी गंभीर दखल घेतली असून तातडीने चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
मतदान प्रक्रियेतील संथपणा कारणीभूत होता का?
मुंबईमध्ये अनेक ठिकाणी यंत्रणांनी संथगतीने मतदान केल्याचा आरोप करत नागरिकांनी संताप व्यक्त केला होता. तसेच अनेक नागरिकांनी तक्रारीही दिल्या होत्या. यावरुन राज्यातील पाचव्या टप्प्यात मतदानाची टक्केवारी घटली, त्यामागे मतदान प्रक्रियेतील संथपणा कारणीभूत होता का? याची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री शिंदे (CM Eknath Shinde ) यांनी राज्याच्या मुख्य सचिवांना दिले आहेत. (CM Eknath Shinde )
प्रशासन कुठे कमी पडले?
मतदानावेळी वृद्ध मतदारांना रांगेचा आणि कडक उन्हाचा झालेला त्रास त्यामुळे मतदानावर झालेला परिणाम यांची सविस्तर चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी (CM Eknath Shinde ) सचिवांना दिले आहेत. पाचव्या टप्प्यातील मतदान प्रक्रियेची प्रशासनाने पुरेशी काळजी घेतली नव्हती का? मतदान टक्केवारी कमी का झाली? प्रशासन कुठे कमी पडले? याची तात्काळ चौकशी करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. (CM Eknath Shinde )
हेही पहा –
Join Our WhatsApp Community