CM Eknath Shinde : नाशिक, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर येथे कांदा महाबॅंक सुरू करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

151
CM Eknath Shinde : नाशिक, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर येथे कांदा महाबॅंक सुरू करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
CM Eknath Shinde : नाशिक, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर येथे कांदा महाबॅंक सुरू करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

कांद्याची नासाडी रोखतानाच त्याच्या साठवणुकीसाठी महाराष्ट्रात अणुऊर्जा आधारित कांदा महाबॅंक प्रकल्प सुरू होत असून नाशिक, छत्रपती संभाजी नगर आणि सोलापूर येथे तातडीने कांद्याची बॅंक सुरू करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

(हेही वाचा –Ganpati Special Trains : पश्चिम रेल्वेकडून गणपतीला कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी खुशखबर; जरुर वाचा)

कांदा महाबॅंक प्रकल्पाचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे आज बैठक झाली. यावेळी पणनमंत्री अब्दुल सत्तार, क्रीडा मंत्री संजय बनसोडे, राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, मुख्य सचिव सुजाता सौनिक, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार मनोज सौनिक, मित्रा चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, विविध विभागांचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव उपस्थित होते. परमाणु आयोगाचे माजी अध्यक्ष ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर दुरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले होते.

कांदा हे नाशवंत पीक आहे. अणुऊर्जेच्या माध्यमातून त्यावर विकिरण प्रक्रिया करून कांद्याची साठवणूक करता येईल. या कांदा बॅंकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. कांद्याची महाबॅंक ही संकल्पना प्रत्यक्षात येत असून त्याची सुरूवात अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी येथून होत आहे. याठिकाणी हिंदुस्थान अॅग्रो संस्थेच्या माध्यमातून कांद्याची बॅंक सुरू होत आहे, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

(हेही वाचा –Paris Olympic 2024 : तिरंदाजीत भारताच्या महिला, पुरुष व मिश्र संघांची उपांत्य फेरीत धडक )

कांद्याचे उत्पादन ज्या भागात जास्त प्रमाणात होते अशा नाशिक, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर येथे विकिरण प्रक्रिया केंद्र उभारून कांद्याची महाबॅंक तातडीने सुरू करण्याचे निर्देशही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिले. यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, पणन, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या जागांचा वापर करण्यात यावा, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

समृद्धी महामार्गालगत सुमारे १० ठिकाणी कांद्याची बॅंक करण्याचे प्रस्तावित असून या कामाला गती देण्याचे निर्देश मुख्यमंत्री यांनी दिले. शेतकऱ्यांच्या हिताचा हा प्रकल्प असून कांद्याच्या महाबॅंकेमुळे कांद्याची साठवणूक करणे शक्य होईल. कांद्याला चांगला भाव मिळाल्यावर तो शेतकऱ्यांना विक्री करता येईल. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळेल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

(हेही वाचा –Maharashtra Govt Schemes : लाडक्या बहि‍णींना राज्य सरकारचं आणखी एक गिफ्ट; ‘या’ निर्णयाच्या अंमलबजावणीला सुरुवात)

शेतकरी केंद्रबिंदू ठेवून हा प्रकल्प राबविण्यात यावा, असे सांगतानाच शेतकरी उत्पादक कंपन्या, सहकारी संस्था यांच्या माध्यमातून प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात यावी जेणेकरून शेतकऱ्यांचे हीत डोळ्यासमोर ठेवून काम होईल. कांदा बॅंक परिसरात मूल्य साखळी विकसित करण्याचे देखील मुख्यमंत्री शिंदे यांनी निर्देश दिले. यावेळी उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे, जेएनपीटी, अपेडा, डॉ. भाभा अणुसंशोधन केंद्राचे संचालक, अधिकारी उपस्थित होते.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.