राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरु आहे. आज म्हणजेच शुक्रवार १ मार्च हा या अधिवेशनाचा पाचवा आणि शेवटचा दिवस आहे. अशातच (CM Eknath Shinde) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर सडकून टीका केली आहे. “शेतकरी नाही तर विरोधक कोमात गेले आहेत. विरोधकांना शेतकऱ्यांशी काहीही देणंघेणं नाही. खोके खोके म्हणणाऱ्यांनीच आमच्या खात्यातून ५० कोटी घेतले.” अशी टीका मुख्यमंत्र्यांनी केली आहे.
(हेही वाचा – RBI : २००० रुपयांच्या नोटांबाबत रिझर्व्ह बँकेनी दिली ‘ही’ माहिती)
काय म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ?
आम्ही केलेली मदत शेतकऱ्यांपर्यंत, नागरिकांपर्यंत पोहोचवतो. आम्हाला खोके-खोके म्हणणाऱ्यांनीच (CM Eknath Shinde) आमच्या शिवसेनेच्या खात्यातून ५० कोटी रुपये घेतले. त्यांची आता चौकशी सुरू आहे. शिवसेना आमच्याकडे आहे. धनुष्यबाण आमच्याकडे आहे. खोके पुरत नाहीत म्हणून कंटेनर… असं मी नाही पण कुणीतरी बोललं आहे असंही एकनाथ शिंदे म्हणाले.
विरोधी पक्षांचा व्यर्थ संकल्प सुरूच होता :
विरोधी पक्ष केवळ टीका करत आहे. आम्ही अंतरिम अर्थसंकल्प मांडला तरी सुद्धा विरोधी पक्षांचा व्यर्थ संकल्प सुरूच होता असंही (CM Eknath Shinde) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या समाप्तीनंतर आयोजित पत्रकार परिषदेतून लाईव्ह
🗓️ 01-03-2024📍मुंबई https://t.co/L61TaVBG17
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) March 1, 2024
(हेही वाचा – BMC Road : महापालिका रस्ते विभागाने ४८ तासात निवीदा ते मंजुरी देण्याची साधली किमया? )
काहीजण आपली आमदारकी वाचवण्यासाठी सभागृहात हजेरी लावतात :
विरोधकांपैकी काही जण सभागृहात बोलण्याऐवजी बाहेर माध्यमांसमोर बोलतात. काहीजण आपली आमदारकी वाचवण्यासाठी सभागृहात हजेरी लावतात. महाविकास आघाडीची वज्रमूठ असल्याचं काहीजण म्हणायचे. फोटो काढताना हातात हात असायचे आणि प्रत्यक्षात पायात पाय… असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. (CM Eknath Shinde)
(हेही वाचा – Railway Mega Block : रविवारी मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर वेळापत्रक)
सकाळी आपल्यासोबत असलेला नेता दुपारी आपल्यासोबत असेल की नाही याची गॅरंटी नाही :
आमच्या महायुतीत अशोक चव्हाण आले आहेत. (CM Eknath Shinde) आणखी काय-काय होईल त्याची चिंता विरोधकांना आहे. त्यामुळे सकाळी आपल्यासोबत चहा प्यायला असलेला नेता दुपारी आपल्यासोबत असेल की नाही याची गॅरंटी विरोधकांना नाही असंही मुख्यमंत्री म्हणाले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community