राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरु आहे. आज म्हणजेच शुक्रवार १ मार्च हा या अधिवेशनाचा पाचवा आणि शेवटचा दिवस आहे. अशातच (CM Eknath Shinde) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर सडकून टीका केली आहे. “शेतकरी नाही तर विरोधक कोमात गेले आहेत. विरोधकांना शेतकऱ्यांशी काहीही देणंघेणं नाही.” अशी टीका मुख्यमंत्र्यांनी केली आहे.
(हेही वाचा – Sharad Pawar : शरद पवारांचे जेवणाचे निमंत्रण मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी नाकारले; काय कारण दिले?)
नेमकं प्रकरण काय ?
काही दिवसांपूर्वी शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस (CM Eknath Shinde) सरकारला धारेवर धरलं होतं. “शेतकरी कोमात आहेत, मात्र कॉन्ट्रॅक्टर मित्र जोमात,” असं उद्धव ठाकरे माध्यमांशी बोलताना म्हणाले होते. त्यांच्या या टीकेवर आता मुख्यमंत्री शिंदे यांनी चांगलंच उत्तर दिलं आहे.
काय म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ?
आज म्हणजेच शुक्रवार १ मार्च रोजी विधिमंडळ अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी साभागृहात भाषण करताना “हे सरकार शेतकऱ्यांचं आहे. शेतकऱ्यांना हे सरकार वाऱ्यावर सोडणार नाही. विरोधकांनी शेतकऱ्यांना काय दिलं, याचा हिशोब मला माहिती आहे. मोदी गॅरेंटीवर सर्वांचा विश्वास आहे. शेतकऱ्यांना हे सरकार वाऱ्यावर सोडणार नाही,” असं म्हणत शिंदे यांनी विरोधकांवर टीका केली आहे.
अर्थसंकल्पीय अधिवेशन | विधान परिषद
🗓️ 01-03-2024📍मुंबई https://t.co/2AnttDszrx
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) March 1, 2024
(हेही वाचा – Prakash Ambedkar: काँग्रेस आणि शिवसेना उबाठामध्ये जागांवरून घमासान )
सरकारच्या चांगल्याला चांगलं म्हणण्याची दानत ठेवा : मुख्यमंत्री
एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) सभागृहात पुढे म्हणाले की; या राज्यात कुठल्याही घटकाला आम्ही वंचित ठेवलं नाही. सरकार चांगलं काम करत असेल तर चांगल्याला चांगल म्हटलं पाहिजे. अर्थसंकप्ल कसा वाचावा, कसा समजून घ्यावा याचं पुस्तक देवेंद्र फडणवीसांनी दिलंय. पुस्तक वाचल्याशिवाय प्रचिती येत नाही. सरकार चुकत असेल तर नक्की टीका करा. सरकारच्या चांगल्याला चांगलं म्हणण्याची दानत ठेवा. काही जण आमदारकी वाचवण्यासाठी साभागृहात हजेरी लावतात. विरोधकांकडे मुद्देच नाही आहेत. टीका करताना विरोधकांची स्क्रिप्ट एकच असते. सकाळी आपल्यासोबत असलेला नेता दुपारी आपल्यासोबत राहील की नाही याची खात्री नाही. अजित पवार विकासाच्या मुद्द्यावर आमच्या सोबत आले. अर्थपूर्ण बोलण्यापेक्षा काही जण निरर्थक बोलतात.
(हेही वाचा – Maharashtra budget sessiont : घोषणांचा सुकाळ, शेतकऱ्यांसाठी निधीचा दुष्काळ; विरोधकांच्या घोषणांनी विधान भवन परिसर दणाणला)
शेतकऱ्यांसाठी अनेक नव्या योजना :
आमच्या सरकारने राज्यात कल्याणकारी योजना आणल्या आहेत. शेतकऱ्यांसाठी अनेक नव्या योजना आहेत. नवीन रेल्वे मार्गासाठी भूसंपादन करणार आहोत. स्वार्थासाठी विचार विकलेल्यांनी आरोप करु नये. सरकार चांगलं काम करतय तरी विरोधक टीका करतात. सरकारने चांगले निर्णय घेतले असं काही विरोधक खासगीत सांगतात. एकाच स्क्रिप्टवरचे विरोधकांचे चित्रपट फ्लॉप होत आहेत. आम्ही शेतकऱ्यांना जे देतो, ते त्यांच्यापर्यंत पोहोचवतो, असंही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. (CM Eknath Shinde)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community