CM Eknath Shinde : पूरपरिस्थितीवर लक्ष ठेवून आवश्यकतेनुसार कार्यवाही करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश!

107
मुंबई महानगरात पोलिसांना पुरेशा सदनिकांसाठी तातडीने प्रस्ताव तयार करा; CM Eknath Shinde यांचे निर्देश

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील पूरपरिस्थितीवर जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याशी चर्चा करून तातडीने मदत पुरवण्याच्या सूचना दिल्या आहेत. पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून पावसामुळे पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यांनी एनडीआरएफ, एसडीआरएफच्या तुकड्या आणि आवश्यकता भासल्यास सेनादलाची मदत उपलब्ध करण्याचे निर्देश दिले आहेत.

(हेही वाचा –Sanjay Pandey: Hindustan Post Exclusive, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे विधानसभा निवडणुक लढवणार!)

मुख्यमंत्री शिंदे यांनी अलमट्टी धरणातील पाण्याच्या विसर्गाबाबत कर्नाटक प्रशासनाशी समन्वय ठेवून नियोजन करण्यास सांगितले आहे. प्रशासनाने सतर्क राहून ऑनफिल्ड सज्ज राहावे, लोकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करावे, निवारा केंद्रांमध्ये सर्व सुविधा पुरवाव्यात, अशी सूचनाही दिल्या आहेत.

(हेही वाचा –Ashadhi Ekadashi 2024 : वारीतून एसटीला फायदा किती? वाचा सविस्तर…)

पूरपरिस्थितीवर लक्ष ठेवून आवश्यकतेनुसार कार्यवाही करण्याचे निर्देश देताना, मुख्यमंत्री शिंदे यांनी लोकांना कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागू नये, याची दक्षता घेण्याचे आवाहन केले आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.