CM Eknath Shinde : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नाशिक दौरा; मुख्यमंत्र्यांकडून कार्यक्रम स्थळांची पाहणी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रोड शो चा परिसर व मुख्य कार्यक्रम मंचची पाहणी करून आयोजनात कोणत्याही उणिवा राहणार नाही याची खबरदारी सर्व अधिकाऱ्यांनी घ्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिले.

205
CM Eknath Shinde : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नाशिक दौरा; मुख्यमंत्र्यांकडून कार्यक्रम स्थळांची पाहणी

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज म्हणजेच शुक्रवार १२ जानेवारी रोजी महाराष्ट्र राज्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. यावेळी ते नाशिक येथे २७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन करतील आणि देशातील तरुणांना संबोधित करतील. यावर्षी, राष्ट्रीय युवा दिनानिमित्त विविध सरकारी विभागांच्या सहकार्याने भारतभरातील जिल्ह्यांमध्ये युवा व्यवहार विभागाच्या सर्व क्षेत्रीय संघटनांद्वारे साजरा केला जाईल. या मोहिमेत ८८,००० हून अधिक स्वयंसेवक सहभागी होणार आहेत. (CM Eknath Shinde)

(हेही वाचा – Narendra Modi: देशातील सर्वात लांब सागरी पुलाचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन)

सर्व कार्यक्रम स्थळांची पाहणी –

अशातच राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या आयोजनाचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी नाशिक येथील तपोवन मैदानावरील सर्व कार्यक्रम स्थळांची पाहणी केली.यावेळी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री दादाजी भुसे, क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे, खासदार हेमंत गोडसे, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी जलज शर्मा व इतर प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. (CM Eknath Shinde)

(हेही वाचा – Ayodhya Ram Mandir : 1008 नर्मदेश्वर शिवलिंग, 21000 पुजारी…अयोध्येत सरयूच्या तीरावर ‘राम नाम महायज्ञ’)

काळाराम मंदिराची पाहणी करून दर्शन –

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी निलगिरी बाग येथे उभारण्यात आलेल्या हेलिपॅडची पाहणी करून समाधान व्यक्त केले. रोड शो चा परिसर व मुख्य कार्यक्रम मंचची पाहणी करून आयोजनात कोणत्याही उणिवा राहणार नाही याची खबरदारी सर्व अधिकाऱ्यांनी घ्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी दिले. तसेच यावेळी शिंदे यांनी श्री काळाराम मंदिराची पाहणी करून दर्शन घेतले. गोदावरी नदी व शहर सुशोभीकरण कामाची देखील पाहणी केली.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.