- मुंबई प्रतिनिधी
लाडकी बहीण, लाडका शेतकरी, लाडके ज्येष्ठ नागरिक आदी सगळ्यांना सुखसमृद्धी लाभो, अशी प्रार्थना लालबाग राजाच्या दर्शनावेळी केल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले. राज्यात सर्वसामान्यांचे सरकार सत्तेत आहे. आगामी विधानसभा निवडणुकीनंतर बाप्पाच्या आशीर्वादाने हेच सरकार सत्तेत येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
(हेही वाचा – Sanjay Shirsat: संजय शिरसाटांची ‘सिडको’च्या अध्यक्षपदी नियुक्ती!)
मुख्यमंत्र्यांनी (CM Eknath Shinde) सोमवारी (१६ सप्टेंबर) सपत्नीक लालबागच्या राजाचे दर्शन केले. मुलगा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, सून वृषाली शिंदे, नातू रुद्रांश आदी सर्व सहकारी उपस्थित होते. शिंदे यांनी लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला भेट देऊन लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. राज्यातील जनतेला सुखी, समाधानी, आनंदी ठेव राज्यातील बळीराजाच्या सर्व अडचणी दूर कर, यंदा पाऊस चांगला पडला आहे. त्यामुळे बळीराजाचे पीक चांगले येऊ दे, एवढेच मागणे त्यांनी श्री गणेशाच्या चरणी मागत मनोभावे आरती केली.
(हेही वाचा – भारत-बांगलादेश क्रिकेट सामना रद्द करा; हिंदु जनजागृती समितीची BCCI कडे मागणी !)
सगळ्यांना सुगीचे दिवस येऊ दे! अजित पवार
लालबागचा राजाचे भक्तिमय वातावरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दर्शन घेतले. गणराया चरणी नतमस्तक होत, त्यांनी सर्वांच्या जीवनात सुख-समाधान, यश, आर्थिक सुबत्ता, समृद्धी, ऐश्वर्य नांदू दे तसेच बळीराजाला, सर्वसामान्यांना सुगीचे दिवस येऊ दे. त्याचप्रमाणे राज्य आणि देश गतिमान होऊ दे अशी प्रार्थना बाप्पा चरणी केली.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community