मला ज्यावेळी सल्ल्याची गरज असते. त्यावेळी मी शरद पवारांना फोन करतो. ते नेहमी चांगले सल्ले देतात, असे वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. ते पुण्यातील मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या 46 व्या सर्वसाधारण सभेत बोलत होते. यावेळी शरद पवार, जयंत पाटील, विरोधी पक्षनेते अजित पवार हे देखील उपस्थित होते.
शरद पवार यांच्या तोंडी नेहमी साखर असते, असा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शरद पवार यांचा उल्लेख केला आहे. गेल्या आठवड्यात संक्रांत झाली, त्यामुळे गोड गोड बोलायचे, मीही गोड बोलणार. मी नुकताच दाओसला जाऊन आलो. कोणी काहीही म्हणो पण मी चांगली गुंतवणूक आणली आहे. शरद पवार यांना यासंदर्भात माहिती आहे. शरद पवार राज्याच्या हितासाठी, भल्यासाठी नेहमी मार्गदर्शन करतात. मलाही जेव्हा जेव्हा गरज आहे तेव्हा फोन करतात तेव्हा सूचना करतात. सहकार क्षेत्रात त्यांचे असणारे योगदान हे नाकारता येत नाही, अशा शब्दांत त्यांनी शरद पवार यांचे कौतुक केले.
( हेही वाचा: कोरोना काळातील मनपा घोटाळ्याचे पुरावे असलेला ‘पेन ड्राईव्ह’ हाती; देशपांडेंचा गौप्यस्फोट )
पवार शेतक-यांच्या पाठिशी
सहकार क्षेत्रात शरद पवारांचा शब्द अंतिम मानला जातो. तेच शरद पवार सगळ्या शेतक-यांच्या पाठिशी आहेत. त्यामुळे सगळ्यांनी त्यांचे सल्ले ऐकले पाहिजेत. त्यानुसार शेतीत किंवा उद्योगात बदल केले पाहिजे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
Join Our WhatsApp Community