राहुल गांधींच्या थोबाडात मारणार का? मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंना सवाल

77

मालेगावमध्ये रविवारी झालेल्या जाहीर सभेत उद्धव ठाकरे यांनी ‘वीर सावरकर आमचं दैवत आहे, त्यांचा अपमान आम्ही सहन करणार नाही’ असा इशारा काँग्रेस नेते राहुल गांधींना दिला होता. याच पार्श्वभूमीवरून सध्या राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटत आहेत. उद्धव ठाकरेंच्या भूमिकेवर अनेक सवाल उपस्थित केले जात आहेत. आता खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची एक आठवण सांगत ‘राहुल गांधींच्या थोबाडात तुम्ही मारणार का?’ असा सवाल उद्धव ठाकरेंना केला आहे.

नक्की काय म्हणाले मुख्यमंत्री शिंदे?

सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंच्या भूमिकेबाबत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, ‘सहन करणार नाही, म्हणजे काय करणार नाही? हे त्यांना (उद्धव ठाकरे) विचारलं पाहिजे. वीर सावरकरांचा अपमान केला म्हणून बाळासाहेब ठाकरे यांनी मणिशंकर अय्यरच्या थोबाडीत दिली होती. ही हिंमत तुम्ही राहुल गांधींच्या थोबाडात देऊन दाखवणार का?

पुढे मुख्यमंत्री म्हणाले की, ‘अपमान सहन करणार नाही म्हणजे काय करणार? जेव्हा सगळ्या बाजूने भडिमार झाला, तेव्हा हे ‘उशीरा सुचलेलं शहाणपण’ म्हणतो तसं हे बोललं गेलं. त्यामुळे बोलून काय होणार आहे? तुमच्या कृतीतून दिसलं पाहिजे. तसंच त्यांचे चिरंजीव म्हणाले, हे दोन वेगवेगळे पक्ष आहेत. वेगवेगळ्या भूमिका आहेत. हे तुम्ही ठरवल्यासारखं करता. तू मारल्यासारखं कर, मी रडल्यासारखं करतो. याच्यापेक्षा दुसरं दुर्दैव असू शकतं नाही.’

(हेही वाचा – वीर सावरकर होण्याची तुमची लायकी नाही; राहुल गांधींवर मुख्यमंत्री शिंदेंची टीका)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.