Maharashtra Political Crisis : व्हीप लागू करायला तुमच्याकडे माणसे किती? मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंना खोचक सवाल

167
Maharashtra Political Crisis: व्हीप लागू करायला तुमच्याकडे माणसे किती? मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंना खोचक सवाल
Maharashtra Political Crisis: व्हीप लागू करायला तुमच्याकडे माणसे किती? मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंना खोचक सवाल

१६ आमदारांच्या अपात्रतेवर तुमचा व्हीप चालणार असे म्हणत आहात. पण व्हीप लागू करायला तुमच्याकडे माणसे किती?, असा खोचक सवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना केला आहे.

बहुप्रतिक्षीत महाराष्ट्र सत्तासंघर्षाच्या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचा निकाला दिला. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला नसता, तर सरकार परत आणले असते, असे महत्त्वाचे निरीक्षण नोंदवले. यामुळे मुख्यमंत्री शिंदेंचे सरकार सत्तेत असणार हे स्पष्ट झाले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या महत्त्वाच्या निरीक्षणामुळे गुरुवारी, ११ मे रोजी मुख्यमंत्री शिंदेंना मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान न्यायालयाच्या निकालानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत करत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.

(हेही वाचा – Maharashtra Political Crisis: घटनाबाह्य बोलणाऱ्यांना कालबाह्य केलं; सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, ‘अखेर सत्याचा विजय झाला. सर्वोच्च न्यायालयाने निकालामध्ये काही गोष्टींचा उल्लेख केला. आमची देखील भूमिका तिच होती की, अपत्रातेचा अधिकार हा अध्यक्षांकडे आहे आणि मेरिटप्रमाणे न्यायालयाने तोच निर्णय दिला आणि अपत्रातेचे अधिकार अध्यक्षांकडे दिले. त्याच बरोबर निवडणूक आयोगाने जो निर्णय दिला होता. त्याला विरोधी पक्षाने म्हणजे पूर्वीच्या लोकांनी, माजी मुख्यमंत्री आणि इतर नेत्यांनी हे प्रकरण न्यायालयात असताना निवडणूक आयोग कसे काय निर्णय घेऊ शकते? त्यावरही सर्वोच्च न्यायालयाने भाष्य केले. निवडणूक आयोगाचा हा अधिकार आहे. म्हणून निवडणूक आयोगाने आम्हाला शिवसेना पक्ष म्हणून मान्यता दिली आणि धनुष्यबाण चिन्ह देखील दिला आहे.’

आम्ही घटनात्मकबाबींचा विचार करुनच सरकार स्थापन केल आहे. जनमताचा आदर, बाळासाहेंबांच्या विचारांचा आदर करून आम्ही सरकार स्थापन केले आहे. नैतिकता कोणी जपली हे मला सांगण्याचा अधिकार नाही. धनुष्यबाण वाचवण्याचे काम आम्ही केले आहे. तसेच व्हीप लागू करायला तुमच्याकडे माणसे किती?, असा सवाल मुख्यमंत्री शिंदेंनी केला.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.