ठाण्यात झालेल्या राड्यावर CM Eknath Shinde नेमकं काय म्हणाले?

216
ठाण्यात झालेल्या राड्यावर CM Eknath Shinde नेमकं काय म्हणाले?
ठाण्यात झालेल्या राड्यावर CM Eknath Shinde नेमकं काय म्हणाले?

ठाण्यात ठाकरे गट (UBT Group) आणि मनसेमध्ये (MNS) मोठा राडा झाला असून आक्रमक मनसैनिकांनी उद्धव ठाकरेंच्या ताफ्यातील गाड्यांवर नारळ फेकून मारले. त्यामध्ये ठाकरेंच्या ताफ्यातील अनेक गाड्यांच्या काचा फुटल्याचं समोर आलं आहे. तसेच मनसैनिकांनी ठाकरेंच्या गाडीवर शेण आणि बांगड्याही फेकल्याचं समोर आलं. त्यामुळे उबाठा गट आणि मनसेमधील वाद तापला आहे. या राड्यावर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

(हेही वाचा –सॅम माणेकशॉ यांच्यानंतर लष्करप्रमुख म्हणून गाजलेले जनरल Gopal Gurunath Bewoor)

राज ठाकरे यांच्या दौऱ्यावेळी उबाठा गटाने चुकीचं आंदोलन केलं होतं. त्यामुळे अॅक्शनला रिअॅक्शन असते ती पाहायला मिळाली. सरकार स्थापन झाल्यापासून पडणार म्हणाले पण सरकार मजबूत झालं. शिवसेना आणि धनुष्यबाण वाचवण्यासाठी आम्ही असा निर्णय घेतला. लोकसभेलापण जर स्ट्राईक रेट पाहिला तर लोकांची पसंती कोणाला आहे हे आम्हाला सांगायची गरज नाही. ठाण्यातील लोकांना औषध द्यायला जमतं, त्यांनी बरोबर जमलगोटा दिलाय. दिल्लीतून मातोश्रीमध्ये बैठका होत होत्या पण आता दिल्लीकडे लोटांगण घातली जात असल्याचं एकनाथ शिंदेंनी प्रत्युत्तर दिलं आहे. (CM Eknath Shinde)

(हेही वाचा –Uddhav Thackeray म्हणाले, अयोध्येत प्रभू श्रीरामाच्या बाणाचा नेम चुकला; भाजपावर टीका करताना श्रीरामाचा अवमान)

पुढे बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, माझ्या दाढीची त्यांना धास्ती आहे. या दाढीनेच त्यांची गाडी खड्ड्यात घातली. बाळासाहेब असते तर त्यांना जंगलामध्ये फोटोग्राफीसाठी पाठवलं असतं. आत काही लोक मला मुख्यमंत्री करा म्हणून कटोरा घेऊन फिरतात. माझ्या लाडक्या बहिणींना एकच सांगायचं आहे की कपटी भावापासून सावध राहा. अशी प्रतिक्रिया शिंदे यांनी दिली आहे. (CM Eknath Shinde)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.