…म्हणून संजय राठोडांना मंत्रिमंडळात स्थान; मुख्यमंत्री शिंदेंनी सांगितले कारण

163

गेल्या दीड महिन्यांपासून रखडलेला एकनाथ शिंदे मंत्रिमंडळाचा विस्तार आज मंगळवारी झाला. पहिल्या टप्प्यात शिंदे गटाच्या ९ आणि भाजपच्या ९ मंत्र्यांचा शपथविधी झाला. शिंदे गटातील आमदार संजय राठोड यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले आहे. संजय राठोडांच्या शपथविधीनंतर भाजपच्या चित्रा वाघांनी टीका करत पूजा चव्हाण प्रकरणातील माझा त्यांच्याविरूद्धचा लढा चालूच राहील अशी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांच्या या विधानानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संजय राठोड यांना मंत्रिमंडळात स्थान का देण्यात आले यावर स्पष्टीकरण दिले आहे.

काय दिले शिंदेंनी स्पष्टीकरण

गेल्या महाविकास आघाडी सरकारमध्ये पूजा चव्हाण या तरूणीच्या मृत्यू प्रकरणात पोलिसींनी संजय राठोड यांना क्लिनचीट दिली होती. त्यांना क्लिनचीट दिल्यामुळेच राठोड यांना आजच्या मंत्रिमंडळ विस्तारात स्थान देण्यात आले आहे. याशिवाय जर कोणाचं काही मत असेल तर नक्कीच त्यांचे म्हणणे ऐकून घेतले जाईल, असे उत्तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चित्रा वाघ यांच्या विधानावर दिले आहे. यासह ते पुढे असेही म्हणाले, लोकशाहीत प्रत्येकाला आपल्या भावना व्यक्त करण्याचा अधिकार आहे, कोणाचं काही म्हणणं असेल तर तेही ऐकून घेतले जाईल असेही एकनाथ शिंदेंनी सांगितले आहे.

(हेही वाचा – संजय राठोडांनी शपथ घेताच चित्रा वाघ यांनी केलं पहिलं ट्वीट; म्हणाल्या हे अत्यंत दुर्दैवी …)

काय म्हणाल्या चित्रा वाघ

आमदार संजय राठोड हे महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री होते. मात्र पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात त्यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्याला लागला. भाजपनेच त्यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली होती त्यामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला होता. मात्र यांनी आज मंत्रिपदाच्या गोपनियतेची शपथ घेतली. यावरून चित्रा वाघ यांनी टीका केली आहे. त्यांनी ट्विटमध्ये असे म्हटले की, “पूजा चव्हाणच्या मृत्युला कारणीभूत असणा-या माजी मंत्री संजय राठोड यांना पुन्हा मंत्रीपद दिलं जाणं हे अत्यंत दुर्दैवी आहे. संजय राठोड जरी पुन्हा मंत्री झाले असले तरीही त्यांच्या विरुद्धचा माझा लढा मी सुरूचं ठेवलेला आहे. माझा न्याय देवतेवर विश्वास आहे. लडेंगे….जितेंगे” ,असं ट्वीट करत चित्रा वाघ यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.