एक नेता, एक पक्ष,एक विचार, एक लव्य,एक नाथ आणि बाळासाहेबांचा आवाज, शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याचा टीझर रिलीज

111

शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर शिंदे गट आणि ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्याची सध्या राज्यात चर्चा आहे. शिवसेनेची परंपरा असलेल्या या मेळाव्यासाठी दोन्ही गटांनी जय्यत तयारी केली आहे. दरम्यान, ठाकरे गटाला शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे ठाकरे गटाकडून जोरदार शक्तिप्रदर्शन केले जात असतानाच शिंदे गटानेही तोडीस तोड उत्तर देण्याची तयारी केली आहे.

शिंदे गटाच्या बीकेसीवर होणा-या दसरा मेळाव्याचा टीझर रिलीज झाला आहे. यामध्ये बाळासाहेब ठाकरे यांचा आवाज असून शिवसेनेचा दसरा मेळावा असा उल्लेख करण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन हा टीझर शेअर केला आहे.

(हेही वाचाः ‘काही माणसं ढळली, पण खरे ‘अढळ’ माझ्यासोबत’, उद्धव ठाकरेंचा शिवाजीराव अढळरावांना टोला)

हिंदवी तोफ धडाडणार

एक नेता, एक पक्ष,एक विचार, एक लव्य,एक नाथ, असा उल्लेखही या टिझरमध्ये करण्यात आला असून बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांचा फोटो देखील आहे. हा शिवरायांचा, शिवसेनेचा आणि हिंदू धर्माचा भगवा झेंडा सातत्याने फडकत रहायला हवा, असे बाळासाहेबांचे आवाहन या टीझरमध्ये असून पुन्हा हिंदवी तोफ धडाडणार, असे देखील त्यात म्हटले आहे. बांद्रा येथील बीकेसी मैदानावर हा दसरा मेळावा होणार आहे.

(हेही वाचाः ‘अशोक चव्हाणांची ‘ती’ क्लिप आम्ही व्हायरल केली तर ते अडचणीत येतील’, शेलारांचा इशारा)

शिंदे गटाची बॅनरबाजी

टीझरसोबतच शिंदे गटाने दसरा मेळाव्याचे पोस्टर देखील प्रसिद्ध केले आहे. या पोस्टरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो झळकवण्यात आला आहे. आम्ही विचारांचे वारसदार असे या पोस्टरवर लिहून शिंदे गटाने उद्धव ठाकरेंना डिवचले आहे. तर बाळासाहेब तुमचा वाघ आहे म्हणून हिंदु्त्वाला जाग आहे, अशी बॅनरबाजी करत शिंदे गटाने उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.