मुख्यमंत्री शिंदे नागपुरातील RSS च्या रेशीमबाग कार्यालयात, डॉ. हेडगेवार यांच्या स्मृतिस्थळाला भेट देऊन केले वंदन

121

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज, गुरूवारी नागपुरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आद्य सरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्या स्मृतिस्थळाला भेट देऊन त्यांना वंदन केले. सकाळी साडे दहा वाजेच्या सुमारास नागपुरातील रेशीमबाग येथील डॉ. हेडगेवार स्मृतीभवन इथे दाखल होत मुख्यमंत्र्यांनी अभिवादन केले. यासोबतच आरएसएसचे दुसरे संघचालक माधवराव गोलवलकर यांच्या स्मृतिनाही एकनाथ शिंदे यांनी अभिवादन केले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप आमदार प्रसाद लाड हेही उपस्थित होते. विशेष म्हणजे कोणत्या दुसऱ्या पक्षाचे मुख्यमंत्री आरएसएसच्या कार्यालयात येण्याची ही कदाचित पहिलीच वेळ असल्याने चर्चांना उधाण आले आहे.

(हेही वाचा – ‘राऊतांना वेड्यांच्या रुग्णालयात भर्ती करा, ठाकरे गट म्हणजे दोस्ताना पार्ट 3’, राणेंचा घणाघात)

राजकीय हेतूने आलो नाही- एकनाथ शिंदे

हे एक प्रेरणास्थान असून स्फूर्तीस्थान आहे. इथे नतमस्तक व्हायला आलोय. बालपणी संघाच्या शाखेत गेलो होते. इथे आल्यावर समाधान आहे. यामध्ये कोणताही राजकीय हेतू नाही. पण मुख्यमंत्री बनल्यानंतर मला इथे आल्यानंतर नवा अनुभव मिळाला आहे. शिवसेना-भाजप सोबत आहोत, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आदरांजली वाहिल्यानंतर म्हणाले.

यापूर्वी २७ डिसेंबर रोजी भाजपचे सर्व आमदार स्मृतिभवन परिसरात आले होते. यावेळी शिंदे गटाचे आमदार ही येतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मात्र त्यादिवशीचे उपक्रम केवळ फक्त भाजप आमदारांसाठी होता, असे भाजपने स्पष्ट केले होते. मात्र आज, मुख्यमंत्री शिंदे स्वतः रेशीमबागला आले आणि डॉ. हेडगेवार आणि संघचालक माधवराव गोलवलकर यांना वंदन केले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.