उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंना शिवसेनेतून बाजूला केले, असा खळबळजनक दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी केला. शिंदे यांनी खाजगी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत हा दावा केला.
(हेही वाचा – PM Narendra Modi यांच्या हस्ते ३० ऑगस्टला वाढवण बंदराचं भूमिपूजन)
एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) त्यांना उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांच्याबद्दल मुलाखतीत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर शिंदे म्हणाले, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंसोबत राज ठाकरे काम करायचे. १९९५ मध्ये विधानसभा निवडणुका झाल्या, त्या निवडणुकीत बाळासाहेब ठाकरेंचा संपूर्ण प्रचार आणि पक्षासाठी वातावरण निर्मिती राज ठाकरेंनीच केली. तेव्हा ते एकत्र होते. पण जेव्हा राज ठाकरेंना जबाबदारी देण्याची वेळ आली तेव्हा उद्धव ठाकरे यांची महत्त्वाकांक्षा जागृत झाली.
(हेही वाचा – Kolkata Doctor Case : डॉक्टरांना जगू द्या! कोलकाता प्रकरणावर आयएमए अध्यक्षांचे भावनिक पत्र)
जशी काही वर्षांपूर्वी त्यांची मुख्यमंत्री बनण्याची इच्छा झाली होती. त्यामुळे राज ठाकरे यांना बाजूला करण्यात आले. त्यानंतर उद्धव ठाकरे यांना कार्याध्यक्ष करण्याचा प्रस्ताव राज ठाकरे यांना मांडायला लावला. यानंतर त्यांना शिवसेनेतून बाजूला केले गेले, असा गंभीर आरोप एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी केला.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community